Drinking Water : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक? वाचा संशोधनात काय म्हटलंय
Drinking Water : सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
Drinking Water : सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी (Water) प्या असे तुम्ही अनेकदा तुमच्या घरी, मित्र मैत्रिणींकडून ऐकले असेल. पण, आपण रिकाम्या पोटी पाणी का प्यावे? यामागील सत्य जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात अधिक माहिती सांगणार आहोत की रिकाम्या पोटी, ब्रश न करता पाणी प्यावे की पिऊ नये. या बाबतीत संशोधनात नेमकं काय म्हटलं आहे. खरंतर, पाणी प्यायल्याने आपले शरीर दिवसभर हायड्रेट राहते. याबरोबरच पोटही चांगले राहते आणि तुमची त्वचाही दिवसभर तजेलदार राहते. डॉक्टरांच्या मते, दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. ब्रश न करताही हे फायदेशीर आहे, असे अनेकांचे मत आहे. या प्रश्नावर संशोधन काय सांगतं हे आज आपण जाणून घेणार आहोत.
ब्रश न करता पाणी पिणे कितपत शरीरासाठी फायदेशीर आहे, संशोधन काय म्हणते?
तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात
ब्रश न करता पाणी प्यायल्याने आपली पचनशक्ती वाढते असे अनेकजण सांगतात. याशिवाय तोंडात आढळणारे बॅक्टेरियाही जमा होण्यापूर्वीच नष्ट होतात. त्यामुळे पाणी पिणे गरजेचे आहे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते
सकाळी दात न घासता रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. त्यामुळे सर्दी होण्याचा धोका कमी होतो. ज्या लोकांना लगेच सर्दी होते, त्यांनी ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी नक्कीच प्यावे.
तजेलदार त्वचा राहते
तजेलदार त्वचेसाठी तुम्ही ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी नक्कीच प्यावे. यामुळे तुमची त्वचा दिवसभर तजेलदार राहते. यासोबतच तोंडात फोड येणे, आंबट ढेकर येणे, बद्धकोष्ठता अशा पोटाशी संबंधित सर्व समस्याही दूर होतात.
मधुमेहाचा धोका कमी होतो
उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्यांनी ब्रश न करता सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यावे. यामुळे तुमची मधुमेहाशी संबंधित असणारी समस्या दूर होण्यास मदत होते.
वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते
तुम्हाला जर तुमचे वजन झटपट कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवू लागेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :