(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monsoon Fashion : पावसाळ्यात लग्न असो की साखरपुडा.. 'हे' गरारा सूट सेट विविध फंक्शन्ससाठी Best!'अशी' स्टाईल करा
Monsoon Fashion : आज आम्ही तुम्हाला काही लेटेस्ट डिझाईन केलेले गरारा सूट सेट दाखवत आहोत, जे तुम्ही लग्नासह इतर समारंभात घालू शकता.
Monsoon Fashion : एकतर पावसाळा, त्यात कोणाचं लग्न असेल, तर अशावेळी कोणते आऊटफिट्स घालावेत असा प्रश्न खास करून महिला वर्गाला पडतो. लग्नासारख्या फंक्शनमध्ये प्रत्येक स्त्रीला सर्वोत्कृष्ट दिसायचे असते, तसं पाहायला गेलं तर पावसाळ्यात कपडे.. मेकअप सगळंच खराब होते, ज्यामुळे अनेक महिलांचा मूड ऑफ होतो. पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही. पावसाळ्यात जर तुम्हाला समारंभाला कोणता पोशाख घालायचा याबद्दल संभ्रम असेल, तर आज आम्ही तुम्हाला काही खास लेटेस्ट डिझाईन्सचे गरारा सूट सांगत आहोत. जे सूट तुम्ही पावसाळ्यातील लग्न समारंभात ट्राय करू शकता. जे परिधान केल्यावर तुम्ही सुंदर दिसाल आणि गर्दीतून उठून दिसाल...
मिरर वर्क गरारा सूट
लग्नाच्या फंक्शन्स मध्ये तुम्ही मिरर वर्कचा गरारा सूट घालू शकता. हा गरारा सूट साधा आहे पण त्यात मिरर वर्क आहे. या प्रकारच्या गरारा सूटमध्ये तुम्ही आउटफिट सारख्याच रंगाचे कानातले घालू शकता आणि या आउटफिटसोबत घालण्यासाठी चांदीच्या रंगाच्या बांगड्या हा उत्तम पर्याय असू शकतो. तुम्ही या प्रकारचा गरारा सूट बाजारातून खरेदी करू शकता आणि ते तुम्ही 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑनलाइनही खरेदी करू शकता.
जॉर्जेट केप गरारा सेट
तुम्ही हा जॉर्जेट केप घरारा सेट हल्दी किंवा मेहेंदी फंक्शन्समध्ये देखील घालू शकता. तुम्ही या प्रकारचे सूट ऑनलाइन खरेदी करू शकता तसेच बाजारातून 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. या सूटसोबत तुम्ही नेकलेस घालू शकता आणि या आउटफिटसोबत कानातले स्टाईलही करू शकता.
जरी वर्क गरारा सेट
हा जरी वर्कचा गरारा सेट तुम्ही लग्नसमारंभातही घालू शकता. या जरी वर्क गरारा सेटमध्ये स्टायलिश लुक मिळवण्यासाठी तुम्ही कुंदन ज्वेलरी घालू शकता आणि फूटवेअरमध्ये तुम्ही हिल्स देखील घालू शकता. हा सूट ऑनलाइन खरेदी करू शकता तसेच बाजारातून 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.
हेही वाचा>>>
Fashion : पावसाळ्यात मेकअप जाण्याचं टेन्शन! Don't Worry, 'असा' करा वॉटरप्रूफ मेकअप की, चेहरा दिसेल ताजातवाना
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )