(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cerebral palsy : ‘सेरेब्रल पाल्सी’ने घेतला सत्या नडेलांच्या लेकाचा बळी, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल...
Zain Nadella : सेरेब्रल पाल्सी हा एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. या आजाराला बळी पडल्यानंतर मुलांच्या चालण्याच्या क्षमतेवर आणि वेगावर मोठा परिणाम होतो.
Cerebral palsy : जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टचे (Microsoft corp.) सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) यांचा मुलगा झैन नडेला (Zain Nadella) याचे सोमवारी गंभीर आजाराने निधन झाले. सत्या नडेला आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झैन नडेला हा 26 वर्षांचा होता. झैन नडेलाला जन्मापासून सेरेब्रल पाल्सी (Cerebral palsy) या गंभीर आजाराशी झुंज देत होता. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे ही दुखःद बातमी दिली आहे. सेरेब्रल पाल्सी ही मेंदू आणि विशिष्ट स्नायूंची समस्या आहे. जगातील अनेक लहान मुलं आणि प्रौढ या आजाराचे शिकार बनले आहेत.
सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय?
सेरेब्रल पाल्सी हा एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. या आजाराला बळी पडल्यानंतर मुलांच्या चालण्याच्या क्षमतेवर आणि वेगावर मोठा परिणाम होतो. मुलांच्या अवयवांमध्ये मंदपणा दिसून येतो. स्नायू कमकुवत होतात. या आजाराला आपण एक प्रकारे अपंगत्वाच्या श्रेणीत टाकू शकतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांची योग्य वाद होत नाही. त्यांचे अनेक अवयव, स्नायू सैल आणि कमकुवत होतात. या आजाराने ग्रस्त मुलांचे अवयव सामान्य लोकांप्रमाणे काम करत नाहीत. 2017 मध्ये अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओंनी यावर एक पुस्तक देखील लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी सेरेब्रल पाल्सीग्रस्त त्यांच्या मुलाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता.
काय आहेत सेरेब्रल पाल्सीची लक्षणे?
‘सेरेब्रल पाल्सी’ हा मेंदूशी संबंधित एक अतिशय गंभीर आजार आहे. जर, मूल जन्माच्या वेळी रडलं नसेल, तर त्याला सेरेब्रल पाल्सी झाल्याची शक्यता असते. काहीवेळा मूल जन्माच्या वेळी काविळीच्या विळख्यात अडकते, त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या देखरेखीखाली विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जन्मानंतर, मुलाची जास्त लाळ देखील सूचित करते की, त्याला सेरेब्रल पाल्सी आहे.
या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना मोठे झाल्यावर चालण्यास त्रास होतो, त्यामुळे याकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सेरेब्रल पाल्सी ग्रस्त मुलांच्या हालचालीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. या आजाराच्या उपचारात औषधोपचारांसोबतच फिजिओथेरपीचाही खूप महत्त्वाचा वाटा मानला जातो.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : आहारात मिठाचं प्रमाण कमी करायचंय? मग 'या' टिप्स खास तुमच्यासाठी...
- Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
- Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )