Merry Christmas 2021 : आज नाताळाचा उत्साह, 'मेरी ख्रिसमस' असं म्हणण्यामागचं कारण काय?
Merry Christmas 2021 : 25 डिसेंबर रोजी सर्वजण एकमेकांना नाताळच्या म्हणजेच ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. जाणून घेऊयात ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉजबद्दल खास गोष्टी
Merry Christmas 2021 : 25 डिसेंबर रोजी सर्वजण एकमेकांना नाताळच्या म्हणजेच ख्रिसमसच्या (Christmas) शुभेच्छा देतात. असं म्हणलं जातं की, या दिवशी प्रभू येशूचा जन्म झाला. जगात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जाणून घेऊयात ख्रिसमस सणाबद्दल काही खास गोष्टी...
डिसेंबर (December) महिना आला की जगभरात 'मेरी ख्रिसमस'चे (Merry Christmas) बोल कानावर पडू लागतात. 'मेरी ख्रिसमस' म्हणत लोक एकमेकांना नातळ सणाच्या शुभेच्छा देतात. तसे भेटकार्डही वाटले जातात. मात्र 'मेरी ख्रिसमस' का बोललं जातं याचं कारण तुम्हांला माहित आहे का? तुम्हांला कधी असा प्रश्न पडला आहे की, दिवाळी, होळी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपण 'हॅपी न्यू इयर', 'हॅपी होली' किंवा 'हॅपी दिवाली' असे म्हणतो मात्र ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना 'मेरी ख्रिसमस' बोललं जातं. आज या मागचं कारण जाणून घ्या...
'मेरी' आणि 'हॅपी' शब्दामधील फरक काय?
युरोपात 18व्या आणि 19व्या शतकात नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलून दिल्या जायच्या. इंग्लंडमध्ये तर आजही अनेक लोक नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलूनच दिल्या जातात. याशिवाय याशिवाय ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनीही 'हॅप्पी ख्रिसमस' हा शब्द वापरला होता. 'हॅपी' आणि 'मेरी' या दोन्ही शब्दांचा अर्थ आनंद असा सारखाच आहे. मात्र, सध्या 'मेरी' हा शब्द अधिक प्रचलित आहे.
प्रसिद्ध साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनी 'मेरी' शब्द प्रचलित केला
'मेरी' हा शब्द प्रसिद्ध होण्यामागे साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांची मोठी भूमिका मानली जाते. आजपासून सुमारे 175 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या 'अ ख्रिसमस कॅरोल' या पुस्तकात 'मेरी' हा शब्द सर्वाधिक वापरण्यात आला होता. यानंतर हे पुस्तक जगभर वाचले गेले आणि त्यानंतर 'हॅप्पी'च्या जागी 'मेरी' शब्दाची प्रथा सुरू झाली. मात्र, तुम्ही 'मेरी ख्रिसमस' ऐवजी 'हॅपी ख्रिसमस' म्हणत जरी नाताळच्या शुभेच्छा दिल्या, तर त्यात काहीही गैर नाही.
रंगीबेरंगी लाइट्स, चॉकलेट्स आणि स्टार्सने ख्रिसमस ट्री सजवली जाते. असं म्हणले जाते की ख्रिसमस ट्रीमुळे सर्व निगेटिव्हीटी निघून जाते. प्रभू येशूच्या आई-वडीलांना शुभेच्छा देण्यासाठी देवदूतांनी फरचे झाड सजवले होते. त्यामुळे ख्रिसमसला फरच्या झाडाला सजवले जाते. असं म्हणतात. रिपोर्टनुसार ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा जर्मनीमधून सुरू झाली.
सांताक्लॉज
ख्रिसमसमध्ये अनेक लोक सांताक्लॉजसारखे कपडे घालून लहान मुलांना गिफ्ट्स देतात. असं म्हणलं जातं की सांताक्लॉज उत्तरी ध्रुवावर राहतो आणि तो उडणाऱ्या स्लेजमधून प्रवास करतो. संत निकोलस यांनी सांताक्लॉज मानले जाते. कारण ते रात्री सर्व गरजू व्यक्तींना भेटवस्तू देत होते. तसेच गरीब आणि गरजू लोकांची ते मदत देखील करत होते. आपली इच्छा काय आहे, ते एका कागदावर लिहून ती चिठ्ठी एका सॉक्समध्ये बरीच लोक ख्रिसमसच्या दिवशी ठेवतीत. एकदा संत निकेलस यांनी एका व्यक्तीची मदत सॉक्समध्ये सोनं देऊन केली. त्यामुळे तेव्हा पासून सॉक्समध्ये चिठ्ठी ठेवून त्यांना हवी ती गोष्टी सांताक्लॉजकडे मागतात.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha