Navratri Recipe : उपवासाची केळ्याची कुरकुरीत कचोरी बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...
Navratri Recipe : जाणून घ्या 'कुरकुरीत केळ्याची उपवासाची कचोरी' बनवण्याची रेसिपी.
Navratri Recipe : दोन वर्षांनंतर जल्लोषात 'नवरात्रोत्सव' (Navratri 2022) होत आहे. नवरात्रोत्स म्हटलं की दांडिया, गरबा आणि उपवासाचे पदार्थ डोळ्यासमोर येतात. पण खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळ येतो. तर जाणून घ्या कुरकुरीत केळ्याची उपवासाची कचोरी (Kachori Recipe) बनवण्याची रेसिपी
केळ्याच्या उपवासाची कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
- कच्ची केळी - तीन-चार
- शिंगाड्याचं पीठ - एक ते दोन वाटी
- मिठ - चवीनुसार
- आलं-मिरची पेस्ट - दोन चमचे
- ओलं खोबरं - एक वाटी
- साखर - चवीनुसार
- सुकामेवा - आवडीनुसार
- तेल - तळण्यासाठी
केळ्याच्या उपवासाची कचोरी बनवण्याची कृती -
- केळ्याच्या उपवासाची कचोरी बनवण्यासाठी सर्वात आधी कच्ची केळी अर्धवट वाफवून घ्यावीत.
- केळी गार झाल्यानंतर त्याची साले काढून ती कुस्करुन घ्यावीत.
- त्यानंतर शिंगाड्याचं पीठ, वाटण, मिठ घालून छान पारी तयार करुन घ्यावी.
- सारण बनवण्यासाठी ओल्या खोबऱ्यात मीठ, साखर, सुकामेवा मिक्स करुन घ्यावा.
- पारीसाठी तयार केलेल्या पिठातून एक गोळा घेत त्याची वाटी तयार करावी.
- तयार केलेल्या वाटीत एक चमचा ओल्या खोबऱ्याचे सारण घालून ती हाताने वळून पारी बंद करावी.
- अशाप्रकारे सर्व कचोऱ्या तयार कराव्यात.
- कचोऱ्या तेलात तळून घ्याव्यात.
- तयार झालेल्या कचोऱ्या दही किंवा चटणीसोबत खायला चविष्ट लागतात.
उपवासाच्या कचोऱ्यासोबत प्या गरमागरम दूध
उपवास करताना अनेकांना थकवा जाणवत असतो. अशावेळी दूधाचे सेवन करावे. दूधात प्रोटिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी-2 असते. त्यामुळे उपवासादरम्यान दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उपवासाच्या मिसळसोबत गरमागरम दूध प्यायल्यानंतर पोट भरण्यासदेखील मदत होईल. दुधामुळे अनेक समस्यादेखील जाणवत नाहीत.
संबंधित बातम्या