एक्स्प्लोर

लो कार्ब - हाय  फॅट आहार म्हणजे काय? तो शरिराला कसा फायद्याचा? जाणून घ्या

Low Carb High Fat Way of Eating :

Low Carb High Fat Way of Eating :  आज आपण लो कार्ब - हाय  फॅट (LCHF) आहाराबद्दल जाणून घेणार आहोत. LCHF आहारपद्धतीचा दैनंदिन जीवनात अवलंब कसा करायचा, ह्यातून सर्व पोषकतत्व पुरवले जातात का? रोज किती प्रमाणात कार्बोदके खायला हवे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. कार्डियो-मेटाबोलिक , स्पोर्ट्स न्यूट्रिशन कन्सल्टंट आणि  तज्ज्ञ डॉक्टर मृदुल कुंभोजकर यांनी लो कार्ब हाय फॅट आहाराबद्दल माहिती दिली आहे. 

LCHF (फॅटी-प्रोटीन) आहार हा एक समतोल आहार आहे. परंतु, आपली भारतीय खाद्यसंस्कृती ही कार्बोदकेयुक्त आहाराची आहे. आता ती बदलणं हे इतक्या सहजा-सहजी होणार नाही. पण जर आपण त्यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोण समजावून  घेतला तर गोष्टी सोप्या होतील.  सकाळच्या नाश्त्यापासून ते  रात्रीच्या जेवणापर्यंत तुम्ही डोसा, इडली, उपमा, चपाती, भात , पराठा, पोहे, इ. खाता आणि ह्याच्याच उलट अगदी अल्प  प्रमाणात  चीज, पनीर, लोणी, तूप हे खाल्लं जातं.  पण तरीही तुम्ही लठ्ठ आहात. पोटाचा घेर हा आहेच. नाही ? तर हे असं का ह्याचा कधी विचार केलाय ? नाही.  त्यामुळे नक्की दोषी कोण? कार्बोदके की स्निग्ध पद्धार्थ ? उत्तर अर्थातच ‘कार्बोदके’ आहे. कार्बोदकेयुक्त आहारामुळे वजन वाढते, म्हणजे अधिक चरबी ही शरीरात साठवली जाते. स्ंनिग्ध पद्धार्थ (dietary fats) आणि शरीरातील अतिरिक्त चरबी ह्यांचा काहीही संबंध नाही. आहारातून घेतलेलं फॅट आणि शरीरातील फॅट ह्यात प्रचंड तफावत आहे.  

LCHF (फॅटी प्रोटीन) आहार घेणे फायद्याचं का आहे? -
इन्सुलिनची प्रतिकार क्षमता कमी करते
एचडीएल वाढते (good cholesterol)
शरीरातील ऊर्जा पातळी दीर्घकाळ टिकून ठेवते. 
स्नायू बळकट बनवते 
वजन कमी करण्यास मदत होते. 
त्वचा एकदम क्लिअर आणि हायड्रेटेड राहते. 
अचानक रक्तात ग्लुकोजची (साखर) वाढ होत नाही, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. 

हा दीर्घकालीन जीवनशैली बदल आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनशैलीचं आत्मपरीक्षण करता तेव्हा तुम्हाला कळेल की चरबी / स्निग्ध पद्धार्थ (डायटरी फॅट्स) खाणे ही गोष्ट फार डावलली गेली आहे. (most underrated). चरबी (डायटरी फॅट्स) वाईट नाही. फॅट्स  ना घाबरू नका. आहारातील चरबी तुमच्या शरीरासाठी चांगली असतात. स्नायूंचं आरोग्य व एकंदरीत आयुष्य निरोगी राखण्यासाठी डायटरी फॅट्स चांगल्या प्रमाणात आवश्यक आहेत.

“डायटरी फॅट्स” नक्की कोणते? :- 
 पनीर 
गाईचं साजूक तूप 
लोणी 
ऑलिव ऑइल 
नारळाचे खाद्यतेल
नट्स (बदाम, काजू, अक्रोड, ई)
क्रीम (साय)
अंडं (पिवळा भाग – अत्यंत महत्वाचा. तो फेकू नये.)

आता महत्वाचा मुद्दा येतो, ह्या LCHF आहारात आपण किती कार्बोदकांचे सेवन केले पाहिजे? तर, ते अंदाजे 100 ग्रॅम असावे. तेवढं पुरेसं आहे. LCHF जीवनशैली आणि किटो भिन्न आहेत, या दोन आहारपद्धतीत गोंधळ करू नका. जेव्हा आपला मेंदू पूर्णपणे चरबीवर चालतो (75% fats), तेव्हा “किटो डायट” असे म्हटलं जातं आणि अशी जीवनशैली  अवलंब करणं थोडं कठीण आहे. म्हणून किटोवर असण्यापेक्षा, आपण LCHF आहाराची अंमलबजावणी केली  पाहिजे ज्यामध्ये कार्बोदके आहेत परंतु प्रमाण कमी आहे. यावर अनेक संशोधनं झाली आहेत आणि हे भविष्यातील योग्य पोषण असणार आहे.

चांगला व्यायाम करणं हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याने  तुम्हाला खलील फायदे होतील :-
 त्वचेची चमक व हायड्रेशन टिकवून ठेवतं
 शरीरात चरबीची टक्केवारी कमी होते आणि स्नायूचे उत्पादन अधिक होण्यास मदत मिळते. 
 भूक सारखी लागत नाही
 चांगली झोप येते. 
 चांगले, निरोगी केस राहतात. 
 चयापचय विकार होत नाहीत (अॅसिडिटी, गॅस ई )
 हार्मोनल असंतुलन होत नाही

फॅट्स जेवणाची  रुचकरता वाढवतात. तर, LCHF (फॅटी-प्रोटीन) जीवनशैलीवर राहू या. ही आहारपद्धत तुमच्या शरीराला पूरक ठरते, समतोल पोषण करते व तुम्हाला आंतरिक तंदुरुस्त बनवते. बदल हा स्वत:पासून घडवा…योग्य पोषण विकसित करा. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर,  दुप्पट दराने  खरेदी,  मुंडेंवर गंभीर आरोपIndrajeet Sawant : महाराज आग्र्याहून सुटताना Rahul Solapurkar तिथे होता का? : इंद्रजीत सावंतABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 04 February 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सAmbernath Girl Murder : प्रेमप्रकरण ते हत्या,अंबरनाथ रेल्वेस्थानकाजवळ काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
Dhananjay Munde: आता सरकारने अंजली दमानियांना विचारुन खरेदीच्या किंमती ठरवायच्या का? धनंजय मुंडे आरोपांवरुन संतापले, म्हणाले....
अंजली 'बदनामिया'! धनंजय मुंडेचा पलटवार, म्हणाले, मी शांत बसलोय असं कोणीही समजू नका
Embed widget