Kitchen Hacks : हिवाळ्यात फ्रीजमध्ये अशा स्टोअर करा पालेभाज्या; भाज्या राहतील ताज्या!
जर तुम्हाला जास्त दिवस भाज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर पालेभाज्या स्टोअर करण्याची ही पद्धत नक्की ट्राय करा.
Kitchen Hacks : हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहारात करावा. अनेक वेळा फ्रीजमध्ये पालेभाज्या खराब होतात. त्यामुळे जर तुम्हाला जास्त दिवस भाज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर पालेभाज्या स्टोअर करण्याची ही पद्धत नक्की ट्राय करा.
- मार्केटमधून आणलेल्या पालेभाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतलेल्या भाज्या सुकल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवा जर तुम्ही भाज्या ओल्या असतानाच फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या लवकरच खराब होतात.
- धुतलेल्या भाज्या सुकल्यानंतर एका पॉलीथिन बॅगमध्ये भरा.
- त्या पॉलीथिन बॅगला 1-2 छिद्र करा. असं केल्याने भाज्या लवकर खराब होत नाहीत.
- फ्रीजमधील व्हेजिटेबल बास्केटमध्ये एक स्वच्छ पेपर ठेवा. त्या पेपरवर भाज्या ठेवलेली पॉलीथिन बॅग ठेवा.
- भाज्यांमधील सर्व पाणी त्या पेपरवर पडते. त्यामुळे भाज्या कोरड्या होऊन जास्त दिवस फ्रेश राहतात.
- फ्रीजमध्ये भाज्यांसोबत कधीच फळे ठेवू नका. भाज्या आणि फळे एकत्र ठेवल्याने भाज्या लवकर खराब होतात.
- भाज्यांना नेहमी पेपर टॉवलमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवा.
- चिरलेल्या भाज्या एका पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा.
- निवडेलेल्या पालेभाज्या एयरटाइट बॉक्समध्ये ठेवल्याने लवकर खराब होत नाहीत.
Winter Health Care: थंडीत 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे
फ्रीजमध्ये कोणते पदार्थ किती वेळ ठेवावे?
फ्रीजमध्ये ठेवलेला भात 2 दिवसात खाऊन घ्यावा, अन्यथा तो खराब होतो. जर तुम्ही गव्हाची चपाती फ्रीजमध्ये ठेवत असाल तर चपाती बनवल्यानंतर 12 ते 14 तासांच्या आत खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे. फ्रीज ठेवलेली कापलेली फळे 4 तासांच्या आत खावीत. केळी हे असे फळ आहे की तुम्ही ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास त्वरीत काळी पडते.
टीप : वरील सर्व उपाय घरगुती असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते.
Health Tips : दररोज दूधात तूप टाकून प्या, पळून जातील आजार; काय आहेत फायदे?