Kangana Ranaut : कंगनानं दहा दिवसात कमी केले पाच किलो वजन; तिचा डाएट प्लॅन माहितेय?
Kangana Ranaut : कंगना तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.
Kangana Ranaut Fitness : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमी चर्चेत असते. कंगनाच्या चित्रपटांना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पंगा आणि थलाइवी या कंगनाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. कंगना तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. रिपोर्टनुसार, तिने दहा दिवसात पाच किलो वजन कमी केले होते. जाणून घेऊयात कंगनाचा डाएट आणि वर्क आऊट प्लॅन-
रिपोर्टनुसार, कंगनानं वजन कमी करण्यासाठी दररोज योगा करणं आणि जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्क आऊट करणं या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. तसेच कंगना मेडिटेशन देखील करते. कंगना डान्स आणि रनिंग दररोज करते.
View this post on Instagram
कंगना वर्क आऊटसोबतच तिच्या डाएटकडे देखील विशेष लक्ष देते. तिच्या वेट लॉस जर्नीमध्ये तिने जंक आणि ऑयली फूड खाणं टाळलं होतं. तसेच कंगना रात्रीचे जेवण आठ वाजता करते. ती रात्रीच्या जेवणामध्ये व्हेजिटेबर सूप आणि उकडलेल्या भाज्यांचे सॅलेड खात होती.
महत्वाच्या बातम्या