International Yoga Day 2021: योगाची सुरुवात करणाऱ्यांसाठी 5 सर्वोत्कृष्ट आसने आणि त्यांचे फायदे
योगाची सुरुवात करणाऱ्यांसाठी काही सोपी आसने सांगण्यात आली आहे. नवशिक्यांसाठी ही आसने उत्तम मानली जातात.
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. योगाची सुरुवात काही सोप्या आसनांद्वारे करुन हळूहळू याची व्याप्ती वाढवता येते. चला आम्ही तुम्हाला अशा पाच सोप्या आसनांबद्दल माहिती देणार आहोत.
अधोमुख श्वानासन
अधोमुख श्वानासन हे एक उत्तम आसन आहे. योगासन शिकणार्या नवशिक्यांना सुरुवातीस या आसनाचा सराव करण्यास सांगितले जाते. या आसनाचा अभ्यास केल्यास शरीरात उर्जा येत, तणाव राहत नाही. हे आसन करणार्या लोकांना चिंता, तणाव आणि निद्रानाश सारख्या समस्या उद्भवत नाही.
वृक्षासन
वृक्षासन नवशिक्यांसाठी चांगलं आसन आहे. हे आसन एखाद्या व्यक्तीला संतुलन राखण्यासाठी आणि लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदत करते. यात सहजपणे उभे राहुन मग शरीराचे एका पायावर संतुलन करावे लागते. याद्वारे, योगी श्वास संतुलित करण्यास देखील शिकतो आणि यामुळे शरीर मजबूत होण्यास मदत होते.
पश्चिमोत्तानासन
जे योगाभ्यास करण्यास प्रारंभ करतात त्यांच्यासाठी पश्चिमोत्तानासन खूप महत्वाचे आहे. पश्चिमोत्तानासन केल्याने पाठीच्या खालच्या भागात आणि वरच्या भागामध्ये एक स्ट्रेच मिळतो. हे आसन बसून, पुढे झुकून केले जाते.
सेतु बंधासन
सेतू बंधासन शरीराला मागच्या बाजूला वाकवून केले जाते. हे अधोमुख श्वानासनाच्या विरुद्ध आहे. कारण शरीर पुढे टेकवून अधोमुख आसन केले जाते. योगाचा सराव सुरू करणाऱ्या लोकांसाठी हे सर्वोत्तम आसन मानला जाते.
बालासन
बालासन आसन प्रत्येकासाठी खूप महत्वाचे मानले जाते. हे सोप्पा योग करणाऱ्यांसाठी विश्रांतीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी मदत करते. हे आसन योग करणाऱ्या सर्व लोकांसाठी चांगलं आहे.