एक्स्प्लोर
UTI | मूत्रमार्गातील जंतूसंसर्गावर नैसर्गिक उपचार
अनेक महिलांमध्ये यूटीआय म्हणजेच मूत्रमार्गातील जंतूसंसर्गाचा त्रास दिसून येतो. महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा संसर्ग आहे. शरीरसंबंध आणि प्रसुतीदरम्यान स्त्रियांमधील संसर्गाचं प्रमाण वाढतं.
मुंबई : आजकाल अनेक महिलांमध्ये यूटीआय म्हणजेच मूत्रमार्गातील जंतूसंसर्गाचा त्रास दिसून येतो. मूत्रपिंड, गर्भाशय, मूत्राशय आणि यापैकी कोणत्याही भागात झालेल्या मूत्रमार्गातील जंतूसंसर्ग (यूटीआय) म्हणतात. महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा संसर्ग आहे. शरीरसंबंध आणि प्रसुतीदरम्यान स्त्रियांमधील संसर्गाचं प्रमाण वाढतं.
लघवी रोखून धरणं, वैयक्तिक स्वच्छता न ठेवणं, शरीरसंबंध, नियंत्रणात नसणारा मधुमेह, मूत्रमार्गातील खडे हे या त्रासाला कारणीभूत ठरणारे घटक आहेत. पण यूटीआयवर नैसर्गिक उपचार कोणते हे जाणून घेऊया.
- यूटीआयवर जलचिकित्सा परिणामकारक ठरते. टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात हळद घालावी आणि त्यात पंधरा-वीस मिनिटे बसावं. दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास जंतूचा नाश होऊन इन्फेक्शन पासून लवकर आराम मिळेल. तसंच जलचिकित्सा करताना अश्विनीमुद्रा केल्यास लवकर आराम मिळू शकतो.
- नेहमी स्वच्छ धुतलेल्या अंतर्वस्त्राचा वापर करावा. तसंच दिवसातून दोन वेळा अंतर्वस्त्र बदलावीत.
- इन्फेक्शनमुळे ओटीपोटात दुखत असेल तर गरम पाण्याने शेक घेतल्यास आराम मिळतो. तसंच ओटीपोटावर लाल मातीचा लेप लावल्याने किंवा थंड पाण्यात पाय बुडवून बसल्यास आराम मिळतो.
- यूटीआयवर कडुनिंबाची पानं ही परिणामकारक ठरतात. कडुनिंबाची पानं गरम पाण्यात उकळवून त्या पाण्याने इन्फेक्शन झालेली जागा स्वच्छ करुन कोरडी करावी. यामुळे जंतूसंसर्ग होणार नाही किंवा झाला असेल तर बरं होण्यास मदत होईल. तसंच कडुनिंबाचं पाणी प्यायल्याने फायदा होतो.
- यूटीआयचा त्रास पुन्हा होऊ नये म्हणून जास्त वेळ लघवी थांबवून ठेवू नये. पाणी प्यायल्याने लघवीवाटे जंतू शरीराबाहेर फेकण्यास मदत होते, त्यामुळे भरपूर पाणी प्यावं.
- आवळा सरबत, लिंबू सरबत, जीरेपूड घातलेलं ताक, गव्हांकुराचा रस, धणेपाणी, जवसाचं पाणी, पुदिन्याचा रस नियमित प्यायल्याने यूटीआय लवकर बरा होण्यास मदत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
बातम्या
जळगाव
Advertisement