Holi 2023 : होळी खेळण्याआधी चेहऱ्यावर फॉलो करा 'या' सोप्या टिप्स; मिळतील अनेक फायदे
Holi Skin Care Tips : होळीत रंग खेळण्याआधी आपल्या त्वचेची काळजी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
'या' टिप्ससह त्वचेच्या डॅमेज प्रूफ करा
सनस्क्रीन लावा : जर तुम्ही होळी खेळणार असाल तर लक्षात ठेवा की त्वचेवर रंग लावण्यापूर्वी तुम्ही SPF 30 असलेले सनस्क्रीन लावा. सनस्क्रिन लावल्याने त्वचेवर एक संरक्षणात्मक थर तयार होतो. त्यामुळे तुमच्या त्वचेला रंगांच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण मिळतं.
द्रवपदार्थाचं सेवन वाढवा : रंगात केमिकल्स असतात, अशा स्थितीत ते चेहऱ्यावर लावल्यास त्वचा आणखी कोरडी होते. हे टाळण्यासाठी, होळीच्या काही दिवस आधी द्रवपदार्थांचे सेवन वाढवा. यामुळे त्वचा निरोगी राहते, तसेच हायड्रेटेड राहते. दही, रसाळ फळे, ताक किंवा ज्यूस पिऊन तुम्ही तुमच्या त्वचेतील कोरडेपणा दूर करू शकता.
बर्फ मसाज करा : रंगांबरोबर खेळण्याआधी त्वचेवर बर्फ चोळा. त्यामुळे पोर्स बंद होतात आणि जेव्हा तुम्ही होळी खेळता तेव्हा ते तुमच्या त्वचेवर बसत नाहीत.
त्वचेला मॉइश्चरायझ करा : होळी खेळण्याआधी त्वचेला मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे. कोणतीही क्रीम वापरण्याऐवजी खोबरेल तेल लावा. बदाम आणि तिळाचे तेलदेखील तुम्ही लावू शकता. हे तेल लावल्याने त्वचेवर मुरुम आणि येत नाही. होळी खेळण्यापूर्वी हात, पाय आणि गालावर मोहरीच्या तेलाने हलका मसाज करा, यामुळे रंगाचा प्रभाव कमी होईल.
पूर्ण झाकलेले कपडे घाला : होळी खेळताना पूर्ण झाकलेले कपडे घाला. तुम्ही स्लीव्हलेस कपडे घातलेत तर हे केमिकल त्वचेला आतून खराब करण्याचे काम करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :