एक्स्प्लोर

World AIDS Day 2020 : जागतिक एड्स दिन, AIDS आणि HIV फरक काय? बचाव कसा कराल?

आज जागतिक एड्स दिवस. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर World AIDS Day 2020 साजरा केला जातो. AIDS आणि HIV फरक काय? बचाव कसा कराल? हे जाणून घेऊया

मुंबई : जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो.

एचआयव्ही एक व्हायरस आहे. हा व्हायरस शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करुन त्या पेशी नष्ट करतो. यामुळे व्यक्तीचं शरीर सामान्य आजारांचाही सामना करु शकत नाही. तसेच जर योग्य वेळी एचआयव्हीवर उपचार घेतले नाहीत तर हा आजार आणखी गंभीर होत जातो आणि एड्सचं कारण ठरतो.

एचआयव्ही आणि एड्समध्ये फरक काय? एचआयव्ही हा एक व्हायरस आहे. हा थेट शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या टी सेल्सवर हल्ला करतो. तर एड्स ( Acquired Immunodeficiency Syndrome) एक मेडिकल सिंड्रोम आहे. एचआयव्ही इन्फेक्शन झाल्यानंतर सिंड्रोम बनतो. एचआयव्हीची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होऊ शकते. परंतु, एड्सचा संसर्ग होत नाही.

असा पसरु शकतो एचआयव्ही? एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्यानेच होतो असे नाही तर ज्याला हा रोग झालाय त्या व्यक्तीचं रक्त जर तुमच्या शरीरात गेलं तरी तो होऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीला टोचलेली सुई जरी दुसऱ्याला टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो.

एचआयव्हीपासून बचाव कसा कराल? एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरु नये. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. तसेच एखाद्या व्यक्तीने वापरलेलं ब्लेड शेविंग करण्यासाठी वापरु नये.

एचआयव्हीबाबत असलेले गैरसमज एचआयव्हीबाबत अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत. मच्छर चावल्याने, एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला स्पर्श केल्याने, एकत्र जेवण केल्याने, संसर्ग झालेल्या व्यक्तीशी बोलल्याने किंवा एकच शौचालयाचा वापर अनेक लोकांनी केल्यामुळे एचआयव्ही होतो. पण हा निव्वळ गैरसमज आहे.

1988 पासून साजरा केला जातो एड्स डे जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यूने जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार 1987 मध्ये मांडला होता. त्यानंतर 1988 मध्ये 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नकाSanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
Ladki bahin yojana: सरकार अपात्र लाडक्या बहि‍णींचा टप्याटप्प्याने 'कार्यक्रम' करणार, महत्त्वाची अट टाकल्याने बहुतांश अर्ज बाद होणार
लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाचा नियम लागू, अपात्र महिला खटाखट बाद होणार
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.