Health Tips : महिलांना मासिक पाळी, गर्भधारणा आणि मोनोपॉझमुळेही होऊ शकतो मोतीबिंदू; वेळीच 'ही' काळजी घ्या
Health Tips : महिलांच्या डोळ्यांच्या समस्या या जैविक आणि सामाजिक अशा दोन्ही कारणांमुळे होऊ शकतात.
Health Tips : आपल्या शरीरातील पाच इंद्रियांपैकी डोळे (Eyes) हा सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक इंद्रिय आहे. याच डोळ्यांच्या संबंधित आजार जो साधारण वयाच्या चाळीशी -पन्नाशीनंतर उद्भवतो तो म्हणजे मोतीबिंदू (Cataracts). आजकाल डिजीटल (Social Media) माध्यमांचा सर्वात जास्त वापर होत असल्या कारणाने मोतीबिंदूच्या समस्या वाढत चालल्या आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका अभ्यासानुसार, पुरुषांपेक्षा महिलांना (Women) डोळ्यांच्या समस्या जास्त असतात. जैविक आणि सामाजिक अशा दोन्ही कारणांमुळे स्त्रियांना मोतीबिंदू होऊ शकतो. यावर जर लगेच उपचार केले अंधत्व येत नाही.
जैविक आणि सामाजिक दोन्ही कारणं जबाबदार
या संदर्भात नेत्ररोग तज्ज्ञ आणि एस्थेटीक सर्जन, लीलावती हॉस्पिटलच्या डॉ. स्नेहा शाह म्हणतात की, वाढत्या वयोमानानुसार, महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. यामधलीच एक समस्या म्हणजे डोळ्यांचा आजार. खरंतर, महिलांच्या डोळ्यांच्या समस्या या जैविक आणि सामाजिक अशा दोन्ही कारणांमुळे होऊ शकतात. रजोनिवृत्ती, मासिक पाळी, गर्भधारणा आणि स्तनपानादरम्यान हार्मोनल चढ-उतार यांसारखे बदलही डोळ्यांच्या समस्येस कारणीभूत ठरतात. उदा.. इस्ट्रोजेन डोळ्यांसाठी संरक्षणात्मक घटक म्हणून काम करते, ज्यामुळे स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर अधिक प्रमाणात डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. गर्भधारणे गर्भधारणेमुळे ऊतींच्या लवचिकतेमध्ये बदल होऊ शकतात, ज्यामुळे दृष्टी संबंधित परिणाम होतात. या व्यतिरिक्त, गर्भावस्थेतील मधुमेह हे रेटिनोपॅथीस कारणीभूत ठरतात. हे जैविक घटक बदलता येत नसले तरी, स्त्रियांमध्ये याविषयी जागरूकता वाढवणे आणि वेळीच निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे.
सामाजिक घटकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, आर्थिक स्थिती, लैंगिक असमानता, अपुरे पोषण, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या घटकांचा समावेश होतो. डॉ. पुढे सांगतात की, पुरुषांच्या डोळ्यांच्या तुलनेत महिलांना या समस्या जास्त असतात. महिलांना गर्भधारणेच्या वेळी असो किंवा वाढत्या वयानुसार तसेच डोळ्यांशी संबंधित बारीक आजारही असो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी महिलांनी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. तसेच, डोळ्यांंसंबंधित जनजागृती, हार्मोनल चढउतार, जीवनशैलीची निवड आणि अनुवांशिकता यांसारख्या घटकांचा समावेश आहे.
तसेच, नेत्ररोगतज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा मुंबईच्या डॉ. नुसरत बुखारी सांगतात की, अभ्यासानुसार, डोळ्यांच्या समस्या देखील लिंगानुसार कमी-अधिक प्रमाणात आढळून येतात. वयासंबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन (AMD), मोतीबिंदू आणि काचबिंदू यांसारख्या दृष्टिदोषांची पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक शक्यता असते. काचबिंदू आणि मोतीबिंदूच्या रुग्णांमध्ये 61 टक्के महिला आहेत आणि 66 टक्के अंध रुग्ण महिला आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
Ramadan 2024 : डायबेटिसच्या रुग्णांनी रमझानचा कठोर उपवास कसा करावा? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )