Women Health : विचित्रच आजार! महिलेने झोपेतच चक्क 3 लाख रुपयांची खरेदी केली, नेमका काय आहे हा दुर्मिळ आजार?
Women Health : तुम्हालाही ऑनलाईन खरेदीची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते, कारण तुम्ही कधी झोपेतील खरेदीबाबत ऐकलंय का?
Women Health : खरेदी म्हटलं तर महिलांचा आवडीचा विषय...! मग ती ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन... तसं पाहायला गेलं तर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये खरेदीची क्रेझ अधिक असते, तुम्हालाही ऑनलाईन खरेदीची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, कारण या संबंधित ब्रिटनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, इंग्लंडमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेला झोपेचा दुर्मिळ आजार झाला आहे, ज्यामुळे तिने झोपताना चक्क 3 लाख रुपये खर्च केले आहेत. जाणून घ्या..
महिलेला झोपेचा दुर्मिळ आजार, झोपेतच केली 3 लाख रुपयांची खरेदी!
आजकालच्या इंटरनेटच्या युगात ऑनलाईन शॉपिंगचे अनेकांना वेड असते. कारण लोकांना पाहिजे त्या वस्तू, हव्या त्या किंमतीत आणि विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध असतात, या वस्तू घरपोच देखील मिळतात, त्यामुळे लोक बाजारात जाण्यापेक्षा ऑनलाईन खरेदीला अधिक महत्त्व देताना दिसत आहेत. अशात महिलांना खरेदीची जास्त आवड असल्याचं तुम्ही लोकांकडून अनेकदा ऐकलं असेल. आज, कोणत्याही प्रकारच्या खरेदीसाठी अनेक ऑनलाइन आणि ऑफलाइन पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणी, वेळ किंवा सीझनमध्ये खुलेपणाने खरेदी करू शकता. तुम्हालाही ऑनलाईन खरेदीची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते, कारण तुम्ही कधी झोपेतील खरेदीबाबत ऐकलंय का? पण हे खरंय, हे ऐकायला विचित्र वाटेल, परंतु इंग्लंडमधील केली नाइप्स या महिलेला झोपेचा दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे ती झोपेतच शॉपिंग करते आणि अलीकडेच तिने झोपेत 3 लाख रुपयांची खरेदी केली.
महिला रात्री शॉपिंग ॲप स्क्रोल करायची
ऑनलाईन खरेदी करताना, तुम्हीही काही खरेदी करण्यापूर्वी खूप तपासत असाल. अशा परिस्थितीत लोक सहसा ग्राहकांच्या रेटींगची मदत घेतात. पण इंग्लंडमध्ये राहणारी केली नावाची महिला दिवसाच नव्हे तर रात्रीही शॉपिंग ॲप्स स्क्रोल करत असे. परिणामी, अलीकडेच तिने झोपताना 3000 पौंड म्हणजेच सुमारे 3 लाख रुपयांची खरेदी केली.
या दुर्मिळ आजारात रुग्णाला काहीच कळत नाही
या महिलेला एक दुर्मिळ प्रकारचा आजार आहे, ज्याला पॅरासोम्निया म्हणतात. अशा स्थितीत रुग्णाला काहीच कळत नाही. या आजारात लोक चालतात, बडबड करतात, खातात-पितात तर काही जण विचित्र कृत्यही करतात, जे या महिलेसोबत घडले. 3 लाखांचे कर्ज जमा झाल्यानंतर संबंधित महिलेने डॉक्टरकडे जाऊन तिला 2006 पासून झोपेच्या विकाराने त्रस्त असल्याचे समजले.
या विचित्र गोष्टी विकत घेतल्या
अलीकडेच एका महिलेने झोपेत ऑनलाइन वेबसाइटवरून खरेदी करताना बास्केटबॉल युनिट, फ्रीज टेबल, टॉफी, पुस्तके, मीठ, पेंट इत्यादीसारख्या अनेक गोष्टी ऑर्डर केल्या. क्रेडिट कार्डचे तपशील फोनमध्ये आधीच सेव्ह केले होते, त्यामुळे कोणतीही अडचण न होता ती काही मिनिटांतच ऑर्डर करू शकत होती, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सामान घरी पोहोचल्यावर ती कोणी ऑर्डर केली होती, हे तिच्या लक्षात येत नसे. अशात तिने बऱ्याच गोष्टी परत केल्या आहेत, परंतु यापैकी बहुतेक गोष्टी परत न करण्यायोग्यही होत्या.
या आजारात अर्धा मेंदू जागृत राहतो
डॉक्टरांनी महिलेला सांगितले की, या आजारात व्यक्ती झोपताना विचित्र क्रिया करू लागते. तपासणी केल्यावर, असे आढळून आले की केलीला केवळ पॅरासोमनियाच नाही तर स्लीप एपनिया देखील आहे, जे झोपेत असताना मेंदूला अर्धवट जागे करण्यास भाग पाडते. महिलेला असाही संशय आहे की तिने झोपेत सायबर गुन्हेगारांशी बरीच माहिती शेअर केली आहे आणि त्यांनी तिच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचाही प्रयत्न केला आहे, ज्यामुळे तिला तिची अनेक कार्डे ब्लॉक करावी लागली आहेत.
हेही वाचा>>>
Women Health : शरीरात अत्यंत शांतपणे पसरतो 'हा' कर्करोग! महिलांनो.. चुकूनही 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )