Salad Tips : सॅलड खाताना केलेली 'ही' चूक पडेल महागात! पचनसंस्थेवर वाईट परिणाम
Health Tips : एका संशोधनाच्या अहवालानुसार, जेवण आणि सॅलड एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.
Salad Tips : कोशिंबीर म्हणजेच सॅलड आरोग्यासाठी लाभदायक असते. सॅलडमध्ये फायबर (Fiber), व्हिटॅमिन (Vitamins) आणि खनिजे (Minerals) भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळतात. असं असलं तरी योग्य पद्धतीने खाणं गरजेचं आहे, नाहीतर शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. सॅलड खाण्याचा शरीराला फायदा व्हावा यासाठी काही निय पाळणं गरजेचं आहे, ज्यामुळे सॅलडमधील पोषकतत्वांचा तुमच्या शरीराला फायदा होईल. संशोधनानुसार, जेवण आणि सॅलड एकत्र खाल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.
एका संशोधनाच्या अहवालानुसार, जेवण आणि सॅलड एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते. जेवण आणि सॅलड एकत्र खाल्ल्याने वेगवेगळ्या गोष्टी पचवण्यासाठी यकृताला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे सॅलड जेवणाच्या अर्धा तास आधी खावं. दिवसभरात मधल्या वेळेत थोडी भूक लागल्यावर सॅलड खाणंही उत्तम आहे.
सॅलड खाण्याचे फायदे
सॅलडमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. सॅलडमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होतो. सॅलडमधील पोषकतत्वांमुळ रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सॅलडमधील फायबरमुळे बद्धकोष्ठ यासारख्या समस्येपासून सुटका मिळते.
त्वचा आणि यकृतासाठी लाभदायक
सॅलड त्वचा आणि यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सॅलडमधील हिरव्या भाज्यांमुळे त्वचेचा पोत सुधारतो, यासोबत यकृतासह शरीराच्या आतील पेशींच्या विकासात मदत होते. काकडी, बीट, कांदा, टोमॅटो आणि लिंबू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.
सॅलड थंडीतही फायदेशीर
थंडीमद्ये गाजर, मुळा, कोबी, यांचा वापर करुन तयार केलेलं सॅलड आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि पचनक्रिया सुरळीत राहील. यासोबतच फ्रूट सॅलडही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही मौसमी फळांचा समावेश आहारात करु शकता
सॅलड खाण्याची योग्य वेळ कोणती?
बहुतेकांना हा प्रश्न सतावतो की, सॅलड खाण्याची योग्य वेळ कोणती, याचं उत्तर इथे जाणून घ्या. महत्त्वाचं म्हणजे जेवताना सॅलड खाण्याची सवय पूर्णपणे चुकीचा आहे. जेवणाच्या अर्धा तास आधी खाणे योग्य ठरेल. सॅलड पचनाला थंड असतं आणि जेवण गरम अशा वेळी थंड आणि गरम दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने दातांचे नुकसान होतं आणि आपली पचनक्रियाही मंदावते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sweet Craving : जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा का होते? यामागचं शास्त्रीय कारण माहितंय?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )