(Source: Poll of Polls)
Weight Loss: चक्क मिठाई खाऊन होणार वेट लॉस? वजन कमी करण्यास मदत करणाऱ्या 'या' 5 मिठाई माहिती आहेत? फक्त जेवल्यानंतर सेवन करावे
Weight Loss: जे लोक मिठाई खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मिठाईमध्ये असे पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे तुमची गोड इच्छा पूर्ण होईल आणि तुमचे वजनही राखले जाईल.
Weight Loss: नुकतीच दिवाळी संपलीय. अशात अनेक गोड पदार्थ तुम्ही खाल्ले असतील. पण हे पदार्थ अतिप्रमाणात खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळेच मधुमेह, रक्तदाब, वजन वाढणे यासारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागतो. साखर किंवा कोणतीही मिठाई खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढते आणि बरेच लोक या कारणास्तव मिठाई खाणे बंद करतात. अशातही अनेक जण गोड खाण्याचे शौकीन असतात. जे लोक मिठाईचे शौकीन असतात, त्यांच्यासाठी काही मिठाई आहेत ज्या वजन कमी करण्यास मदत करू शकतात, जाणून घेऊया...
काहीही खाताना वजनाचा खूप विचार करावा लागतो
बऱ्याच लोकांना गोड खाणे इतके आवडते की, ते सतत काहीतरी खात राहतात, त्याचवेळी ते त्यांच्या वजनाची चिंता करतात. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक जिममध्ये जातात आणि वजन टिकून राहावे म्हणून हेवी व्यायाम करतात, पण ज्यांना मिठाईचे शौकीन आहे, आपण काय खातो आणि काय पितो, यात आपल्या वजनाचा खूप विचार करावा लागतो, जेणेकरून त्यांचे वजन वाढू नये.
गोड इच्छा पूर्ण होईल.. तुमचे वजनही राखले जाईल.
जे लोक मिठाई खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी मिठाईमध्ये असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे तुमची गोड इच्छा पूर्ण होईल आणि तुमचे वजनही राखले जाईल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मिठाईंबद्दल सांगत आहोत, जे चवीला गोड तर आहेतच, पण खूप आरोग्यदायीही आहेत.
As with all the Nutrisystem programs, they are personalized to help to deliver effective and safe weight loss. Most customers can expect to lose up to up to 18 pounds and 10 inches in their first two months. https://t.co/fpp8DD2UUA #weightloss #nutrisystem pic.twitter.com/UqQ553sMYo
— Diet & Fitness Tips (@dietfitnesstips) May 9, 2020
जेवणानंतर या 5 आरोग्यदायी मिठाई खा
गूळ
जेवणानंतर गोड खाण्याची सवय असेल, तर तुम्ही घरी ठेवलेला गूळ खाऊ शकता. गुळात साखरेपेक्षा खूपच कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन वाढत नाही आणि पचनही चांगले होते.
मध
खाल्ल्यानंतर तुम्ही मधही खाऊ शकता. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे खोकला आणि घसादुखीपासूनही खूप आराम मिळतो. मध खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि पचनक्रिया सुधारते.
सुका मेवा
अन्न खाल्ल्यानंतर, चालताना तुम्ही मनुका किंवा इतर ड्राय फ्रूट्स खाऊ शकता, जे गोड असतात परंतु कमी कॅलरीज असतात. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराला प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स मिळतात.
खजूर
जेवल्यानंतर तुम्ही खजूर खाऊ शकता किंवा त्यांना एखाद्या पदार्थात मिसळून खाऊ शकता, जसे की खजूर खीरमध्ये मिसळून खाऊ शकता. हे गोड आणि उर्जेने भरलेले आहे, त्याचा वजनावर परिणाम होत नाही.
चिया पुडिंग
खाल्ल्यानंतर तुम्ही चिया पुडिंग तयार करून खाऊ शकता. यासाठी एका छोट्या भांड्यात दूध, दही, चिया बिया, मॅपल सिरप आणि थोडे मीठ मिक्स करून 30 मिनिटे ठेवा. चिरलेली ताजी फळेही त्यात घालून खाऊ शकता, त्यामुळे तुमचे वजन टिकून राहते.
हेही वाचा>>>
Weight Loss: आश्चर्यच! नाश्त्याला ईडली-सांबार, जेवणात बिर्याणी खाऊन 30 किलो वजन कमी केलं? कसं केलं शक्य? जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )