एक्स्प्लोर

Weight Loss: ‘स्लिम व्हायला इंजेक्शनच पुरेसं?’ वजन कमी करण्याबाबतचे 5 मोठे भ्रम आणि वास्तव

या इंजेक्शन्सबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. योग्य माहिती अभावी अनेक जण चुकीचे निर्णय घेतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

Weight Loss: सध्या बहुतांश व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजत आहेत. वजन नियंत्रणासाठी ते विविध पर्यायांचा शोध घेत आहेत. अशावेळी वजन कमी करण्यासाठी वापरली जाणारी इंजेक्टेबल औषधे अलीकडे प्रचंड चर्चेत आली असून त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. ही औषधे भूक कमी करणे, तृप्त झाल्याची भावना वाढवणे आणि पोट रिकामे होण्याची प्रक्रिया मंदावणे प्रकारे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, सैफी हॉस्पिटल आणि नमहा हॉस्पिटल्समध्ये बॅरिएट्रिक, हर्निया आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी याबाबत असणारे गैरसमज आणि वास्तविकता सांगितली आहे.

मात्र या इंजेक्शन्सबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. योग्य माहिती अभावी अनेक जण चुकीचे निर्णय घेतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या औषधांबाबत असलेले काही महत्त्वाचे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.

गैरसमज १: वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता नाही

वास्तविकता:

वजन कमी करण्याची हे इंजेक्शन्स कोणताही जादूई उपाय ठरत नाही किंवा एका रात्रीत परिणाम दाखवत नाहीत. जरी ते भूक कमी करण्यात मदत करत असले तरी संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत त्यांचा वापर केल्यासच चांगले परिणाम मिळतात. व्यायामामुळे वजन कमी करताना होणारे स्नायूंचे नुकसान कमी होते आणि एकूण आरोग्य सुधारते. त्यामुळे या इंजेक्शन्सकडे वजन कमी करण्याचा एक जलद मार्ग म्हणून पाहू नये.

गैरसमज २: इंजेक्शन घेत असताना आहाराचे सेवन फारसे आवश्यक नाही

वास्तविकता:

इंजेक्शन्स भूक कमी करतात, पण तरीही संतुलित व पोषक आहार घेणे आवश्यक आहे. योग्य आहारामुळे मळमळ, अशक्तपणा यांसारखे दुष्परिणाम टाळता येतात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. आहारात ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, डाळी यांचा समावेश करावा आणि जंक फूड, हवाबंद डब्यातील व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत.

गैरसमज ३: केवळ अतिलठ्ठ असलेल्या व्यक्तीच या इंजेक्शन्ससाठी पात्र असतात

वास्तविकता:

३० किलो/चौ.मी. पेक्षा जास्त बीएमआय (BMI) असलेल्या व्यक्तींना, इतर आजार नसले तरी, वजन कमी करण्याची इंजेक्शन्स दिली जाऊ शकतात. तसेच २७ किलो/चौ.मी. किंवा त्याहून अधिक बीएमआय असलेल्या आणि टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या वजनाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनाही ही औषधे उपयुक्त ठरू शकतात. मात्र, ही औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

गैरसमज ४: कायमस्वरूपी वजन कमी होते

वास्तविकता:

लठ्ठपणा ही एक दीर्घकालीन, प्रगतीशील आणि पुन्हा पुन्हा उद्भवणारी आरोग्य समस्या आहे. इंजेक्शन्स बंद केल्यानंतर वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन टिकवून ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल, संतुलित आहाराचे सेवन आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

गैरसमज ५: वजन कमी करण्याची इंजेक्शन्स प्रत्येकासाठी एकसारखाच परिणाम देतात 

वास्तविकता:

प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगवेगळी असल्याने उपचारांना मिळणारा प्रतिसादही वेगवेगळा असतो. शरीराचे वजन, चयापचय, मधुमेह, शारीरीक हालचालीची क्षमता आणि जीवनशैली यांसारख्या घटकांवर डोस व परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने वापरले म्हणून ही औषधं स्वमर्जीने घेऊ नका.

तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

वजन कमी करण्याची इंजेक्शन्स ही प्रभावी साधने असू शकतात, पण ती वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापरली पाहिजेत. स्वमर्जीने या औषधांचा वापर केल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. योग्य माहिती, वैद्यकीय सल्ला आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल यांच्या मदतीनेच वजन कमी करणे शक्य आहे हे लक्षात ठेवा.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget