Asthma Symptoms : दीर्घकाळ खोकल्याकडे दुर्लक्ष करु नका, अस्थमाचं ठरु शकतं लक्षणं, कसं ओळखाल?
Health Tips : अस्थमा आजार झाल्यास व्यक्तीला खूप खोकला येतो. दमा झालेल्या व्यक्तीला नियमित कामे करण्यातही थकवा जाणवतो. लक्षणं कशी ओळखायची जाणून घ्या.
Asthma Symptoms : बदलत्या ऋतूनुसार सर्दी-खोकला (Cold - Cough) यांसारख्या आजारांची समस्या उद्भवते. अशा वेळी औषधे घेतल्यानंतर सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळते. पण जर औषधं घेतल्यानंतरही खोकल्याच्या समस्येपासून सुटका होत नसेल आणि दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करु नका. दीर्घकाळ खोकला (Prolonged cough) अस्थमा (Asthma) म्हणजे दम्याचं लक्षण असू शकतं. अस्थमा आजारामध्ये श्वसननलिकेला सूज येते. यामुळे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होतात आणि जास्त खोकला येतो. अस्थमाचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. अस्थमाची लक्षणं काय आहेत जाणून घ्या.
अस्थमाची लक्षणं (Asthma Symptoms)
- अस्थमा झाल्यास सुरुवातीचं लक्षण म्हणजे अस्वस्थ वाटणे. अस्थमा आजाराने ग्रस्त व्यक्तींच्या घसा खवखवणे तसेच बोलतना कर्कश किंवा शिटीसारखा आवाज येतो.
- दमा झाल्यावर प्रामुख्याने खोकल्याची समस्या निर्माण होते. बोलताना, हसताना किंवा व्यायाम करताना अशा व्यक्तींना खोकल्याचा जास्त त्रास होतो.
- दमा झाल्यावर रुग्णांना अनेक वेळा खूप खोकला येतो आणि छातीत दुखू लागतं.
- अस्थमा झाल्यावर तुमच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. यामुळे अशा व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
- अस्थमाच्या रुग्णांना छातीत गच्च असल्यासारखे वाटते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक चांगलं आहे.
- अस्थमा झाल्यावर रुग्णांना श्वास घेताना त्रास होतो तसेच कोणतेही शारीरिक कार्य करण्याची क्षमता कमी होते.
- अस्थमाच्या रुग्णांना अधिक थकवा येतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या इतर बातम्या :
- High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? 'या' गोष्टींपासून दूर राहा, पाहा यादी
- Heart Health : पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका अधिक, काय आहे यामागचं कारण? हे वाचा
- Thyroid : थायरॉइड झाल्यावर चहा पिणं योग्य? जाणून घ्या सविस्तर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )