Toothpaste Fact Check : तुमच्या टूथपेस्टवरील 'या' रंगांचा अर्थ काय? याचा आरोग्यावर होतो परिणाम?
Toothpaste Colour Marks : टूथपेस्टवरील रंग त्यामध्ये असणाऱ्या केमिकलवर आधारित असतात, असा दावा करणारे अनेक व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण यामागचं खरं सत्य काय आहे जाणून घ्या.
Toothpaste Colour Marks Fact Check : इंटरनेटवर सहजरित्या कोणतीही माहिती उपलब्ध होते. पण याच इंटरनेटद्वारे अनेक वेळा खोटी माहितीही पसरली जाते. ज्यामुळे लोकांची दिशाभूल होऊ शकते. टूथपेस्टवरील रंग त्यामध्ये असणाऱ्या केमिकलवर आधारित असतात, असा दावा करणारे अनेक व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण यामागचं खरं सत्य काय आहे जाणून घ्या.
व्हायरल पोस्ट्सनुसार, टूथपेस्टवरील रंगीबेरंगी पट्टे असतात. हे पट्टे काळा, लाल, निळा किंवा हिरव्या रंगाचे असतात. या प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ आहे. या रंगांवरून तुमची टूथपेस्ट केमिकलयुक्त आहे की नैसर्गिक याची माहिती मिळते. मात्र हा दावा खोटा आहे. टूथपेस्टवरील कलर कोड त्यामधील केमिकलची माहिती देत नाही.
व्हायरल पोस्टनुसार तुमच्या टूथपेस्टवरील रंगांचा अर्थ
हिरवा रंग म्हणजे : पूर्णपणे नैसर्गिक
निळा रंग म्हणजे : नैसर्गिक आणि औषधं यांचं मिश्रण
लाल रंग म्हणजे : नैसर्गिक आणि रासायनिक
काळा रंग दाखवतो : पूर्णपणे केमिकलयुक्त
पण टूथपेस्टवरील कलर कोडचा वास्तविक अर्थ असा नाही. या रंगांचा केमिकलच्या माहितीशी काही संबंध नाही.
टूथपेस्टवरील कलर कोडचा खरा अर्थ काय?
टूथपेस्टच्या ट्यूबवर असणाऱ्या कलर कोडचा त्यामधील केमिकल किंवा घटकाशी काहीही संबंध नाही. हे एक लहान कलर कोड किंवा चिन्ह आहेत, जे प्रोडक्टच्या उत्पादनादरम्यान म्हणजे टूथपेस्टची ट्यूब तयार करताना छापले जातात. टूथपेस्ट ट्यूबवरील हे कलट कोड लाईट बीम सेन्सर्सद्वारे वाचता येतात. हे कलर कोड पॅकेजिंगबाबतची माहिती देतात. या कलर कोडद्वारे सेन्सर्सला कळतं की टूथपेस्टची ट्यूब कुठे कापली पाहिजे किंवा दुमडली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकेजिंगच्या माहितीसाठी हे कलर कोड वेगवेगळ्या रंगात असतात.
टूथपेस्टमधील घटकांची माहिती सर्वसाधारणपणे टूथपेस्टच्या बॉक्सवर किंवा ट्यूबवर दिलेली असते. सामान्यतः, टूथपेस्टमध्ये ठराविक घटक असतात, ज्यामध्ये दात स्वच्छ करण्यासाठी ऍब्रेसिव्ह, फ्लेवरिंग एजंट्स, टूथपेस्ट मऊ करण्यासाठी ह्युमेक्टंट्स आणि फोम तयार करण्यास मदत करणारे डिटर्जंट्स यांचा समावेश होतो. टूथपेस्टला सुकून कडक होऊ नये यासाठी ग्लिसरॉल, xylitol आणि sorbitol सारखी humectant या घटकांचा वापर केला जातो. टूथपेस्टमधील कॅल्शियम कार्बोनेट आणि सिलिका हे पदार्थ कचरा काढून दात पॉलिश करण्यास मदत करतात. तर पुदीना, पेपरमिंट, बडीशेप, बबलगम किंवा दालचिनी यांसारखे फ्लेवरिंग एजंट श्वासाच्या दुर्गंधीशी लढण्यास मदत करतात.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )