Health Tips : सतत घसा खवखवतोय? झटपट आराम मिळवण्याकरता करा 'हे' सोपे घरगुती उपाय
बदलत्या ऋतूमध्ये घसा खवखवणे किंवा दुखणे ही समस्या वाढते, ज्यामुळे त्रास होतो. तथापि, या घरगुती उपायांनी तुम्ही घशातील सूज आणि होणारी खवखव लक्षणीयरीत्या कमी करू शकता.
How To Get Rid from Throat Irritation : देशातील काही भागात मान्सूनने (Mansoon) दणका दिला आहे. उष्णतेपासूनही दिलासा मिळू लागला आहे. पावसाळा हा खूप खास मानला जातो. या ऋतूत बरेच बदल होतात. काहींना भिजण्याचा आनंद घ्यायचा असतो तर काहींना या ऋतूत मजा करायची असते. मात्र, या ऋतूत रोगांचा प्रसारही झपाट्याने होतो.यापैकी सर्वात सामान्य म्हणजे घसा खवखवणे, जो प्रत्येकाला होतो. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, ज्यामुळे आपण सहजपणे आजारांना बळी पडतो. याशिवाय वातावरणातील बदल, खराब आणि दुषित पाणी, थंडी, आर्द्रता इत्यादींमुळे पावसाळ्यात घसा खवखवण्याची शक्यताही वाढते.म्हणूनच, घसा खवखवणे, दुखणे या समस्यांवर काही घरगुती उपाय पाहुयात.
- मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर त्याने घशाला लगेच आराम मिळू शकतो. दिवसातून किमान दोन वेळा तुम्ही मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकता.
- चहामध्ये लवंग, तुळशीची पानं, हळद मिक्स करुन तो प्या.
- आलं टाकलेला चहा प्या.
- लिंबाचा रस आणि मध एकत्र करून गरम पाण्यात मिसळून प्या.
- पाण्यात मध व कांदा टाकून उकळा आणि गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.
- घसा खवखवत असल्यास वाफ घेणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे घशात झालेला संसर्ग कमी होण्यास मदत होते.
- घसा खवखवणे किंवा कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असल्यास मधाचे सेवन करावे. मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. मधामुळे घसा खवखवणे आणि सूज यांमध्येही आराम मिळतो.
- घसा खवखवणे आणि दुखत असल्यास रात्री हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक घटक असतात जे जळजळ आणि वेदना कमी करतात. हळद घशासाठी फायदेशीर आहे.
- घसादुखी झाल्यास आल्याचा वापर करा. आल्यामध्ये शक्तिशाली औषधी गुणधर्म असतात. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा तुकडा किसून एक ग्लास पाण्यात टाकून उकळा. 5 मिनिटे उकळल्यानंतर ते पाणी गाळून कोमट प्या.
- सफरचंद सायडर व्हिनेगर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा. ते थोडे थंड होऊ द्या आणि रिकाम्या पोटी प्या.
- खवखवणाऱ्या घशाला आराम मिळण्यासाठी गरम पाणी उपयुक्त ठरते. यामध्ये चिमूटभर हळद घातल्यास इन्फेक्शन बरे होण्यास मदत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Vomiting In Car : तुम्हालाही प्रवासात मळमळ, उलट्या होतात का? करा 'हे' सोपे उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )