एक्स्प्लोर

Sweet Potato : उकडलेलं रताळं आरोग्याचा खजिना, खाल्ल्याने होतील 'हे' 5 फायदे

Health Benefits Of Sweet Potato : उकडलेल्या रताळ्यामध्ये आरोग्याचा खजिना असतो. याचं सेवन करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रताळ्याचे फायदे वाचा.

Sweet Potato Benefits : रताळे (Ratale) हे आयुर्वेदिक (Ayurveda) वनस्पती आणि कंदमूळ आहे. हे चवीला अतिशय रुचकर असते. रताळ्याचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. खाल्ल्याने शरीराला कोणते आरोग्य फायदे होतात. रताळ्यामध्ये आरोग्याचा खजिना असतो. याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Health Benefits Of Sweet Potato ) आहे. गोडसर चव आणि मलाईदार गर असं रताळं नारंगी, तपकिरी आणि जांभळ्या रंगांचं असतचं. उकडलेलं रताळं खाणं आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. नियमितपणे उकडलेलं रताळं खाल्ल्यास आरोग्यासाठी कोणते फायदे होतील, हे वाचा. 

रताळे खाण्याचे फायदे

पोषक तत्वांनी समृद्ध

रताळ्यामध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते. रताळं पोषक तत्वांनी समृद्ध असते. रताळ्याचं सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर यासारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

पचनक्रिया सुरळीत होईल

रताळ्याचं सेवन केल्याने पचन व्यवस्थित होतं. रताळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे आतड्यांच्या हालचालींचे नियमन करणं सोपे होतं आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रताळ्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात फायदेशीर

शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती अनेक आजारांना बळी पडण्यापासून आपलं संरक्षण करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रताळ्याचं सेवन करणं फायदेशीर आहे. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे रताळे खाल्ले तर सर्दी, खोकला, फ्लू आणि इतर विषाणूजन्य आजारांचा धोका कमी होईल. 

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

भारतात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अलिकडे प्रौढांपासून ते तरुणांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारणे फार गरजेचं आहे. रताळ्याचं सेवन केल्याने हृदयाचं सुधारते, ज्यामुळे हृदयासंबंधित आजार दूर ठेवण्यास मदत होईल. रताळ्यामध्ये त्यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

वजन नियंत्रित राखण्यास मदत

चवी गोड असलेलं रताळं वजन नियंत्रित राखण्यासही फायदेशीर आहे. रताळ्याची चव गोड असली तरी, हे कमी उष्मांक आणि उच्च फायबरयुक्त आहे. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्हाला जास्त खाण्याच्या सवयीपासून दूर करते आणि यामुळे हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Weight Loss : वजन कमी करायचंय? तर नाश्त्यातून 'या' गोष्टी हटवा, लगेच फरक जाणवेल

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Sanjay Raut : स्वबळाच्या नाऱ्यानं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? संजय राऊत यांचं दोन शब्दात उत्तर, तर्क वितर्क थांबणार?
स्वबळाच्या नाऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, मविआच्या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन शब्दात उत्तर देत सगळं स्पष्ट केलं
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Embed widget