धक्कादायक पण सत्य, ऑफिसमध्ये तासन् तास खुर्चीवर बसल्यानं तुम्ही तुमच्या मृत्यूला आमंत्रण देता
Healthy Lifestyle: तुम्ही तुमच्या ऑफिसच्या खुर्चीच्या प्रेमात पडला असाल तर, तुम्ही तुमच्या मृत्यू आमंत्रण देताय, लक्षात ठेवा... घाबरवत नाही, संशोधनातून समोर आलंय.
Health Research: नोकरदार असाल तर, ऑफिसमध्ये बैठं काम करून करून कंटाळला असाल. नोकरी करणारे बहुतांश लोक आपल्या दिवसाचा सर्वाधिक वेळ ऑफिसमध्ये घालवतात. ऑफिसमध्ये आपण सगळे 8 ते 9 तास खुर्चीवर (Office Chair) बसून घालवतो. त्यात जर तुमचा डेस्क जॉब असेल, तर मग दिवसभर खुर्चीवर बसूनच काम करावं लागतं. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला जर तुमच्या ऑफिसच्या खुर्चीचा जास्तच लळा लागला असेल आणि तुम्ही तासन् तास जर त्या खुर्चीवर बसून राहत असाल, तर तुम्ही तुमच्या मृत्यूला आमंत्रण देत आहात. आम्ही तुम्हाला घाबरवत नाही, तर सत्य सांगतोय. ही बाब एका संशोधनातून (Healthy Lifestyle Research) समोर आली आहे. हे कितीही धक्कादायक असलं, तरी हेच सत्य आहे.
नुकत्याच झालेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, दिवसभर ऑफिसच्या खुर्चीवर बसल्यानं मृत्यूचा धोका 16 टक्क्यांनी वाढू शकतो. संशोधनातून समोर आलेली अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, तासन् तास खुर्चीवर बसल्यानं पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त धोका असू शकतो.
तासन् तास बसल्यानं मृत्यूचा धोका जास्त
हे संशोधन जामा JAMA Network Open मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. तैवानमधील सुमारे 4,81,688 लोकांनी या संशोधनात भाग घेतला. जे लोक त्यांच्या खुर्च्यांना चिकटून राहिलेत, त्यांच्यात हृदयविकारानं मृत्यू होण्याचा धोका 34 टक्के आणि सर्व कारणांमुळे मृत्यूची शक्यता 16 टक्क्यांनी वाढली आहे.
एकाच जागेवर बसल्यानं पायांवर जोर येतो
जेव्हा आपण बसतो, तेव्हा आपण आपल्या पायांवर ओझे टाकतो. परंतु, त्याचा आपल्या आरोग्यावर भार पडतो. आपल्या शरीराची रचना ज्याप्रमाणे करण्यात आली आहे, त्यानुसार आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी त्याची हालचाल होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळी आपण तसं करत नाही, त्यावेळी शरीराच्या समस्या उद्भवू लागतात.
लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च साखरेची पातळी, पोटावरील चरबी, कोलेस्टेरॉलची पातळी हे सर्व जास्त बसल्यामुळे होतात. एवढंच नाही तर, संशोधनात असंही दिसून आलं आहे की, जर तुम्ही कोणत्याही शारीरिक हालचालींशिवाय दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त वेळ बसलात, तर तुमचा मृत्यू होण्याचा धोका लठ्ठपणा आणि धूम्रपानामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याइतकाच असतो.
जर तुम्हाला वाटत असेल की, कामानंतर जिममध्ये जाण्यानं इतका वेळ बसण्याचा धोका कमी होईल, तर असा विचार करणं चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या ऑफ-अवर्समध्ये जिममध्ये घाम गाळत असलात तरीही, जास्त वेळ बसणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. जास्त वेळ बसल्यानं आपले स्नायू सक्रिय राहत नाहीत. जगातील 70 टक्क्यांहून अधिक लोक खुर्चीवर सहा तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात आणि आपल्या मृत्यूला स्वतःहून आमंत्रण देतात, असं संशोधानातून समोर आलं आहे.
तासन् तास खुर्चीवर बसल्यानं काय होतं?
- वजन वाढणं आणि लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते
- फिजिकल अॅक्टिविटी न केल्यानं शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढू शकतो.
- सुस्तावलेल्या जीवनशैलीमुळे हाय ब्लडप्रेशरचा धोका संभवतो
- फिजिकल अॅक्टिविटी टाळलंत, तर त्यामुळे टाईप 2 डायबिटीजचा धोका संभवतो.
धोका कसा कमी कराल?
- तुम्हाला सर्व आजारांपासून मुक्ती हवी असेल तर, सर्वात आधी तुम्हाला खुर्चीचा मोह सोडून काही काळाच्या अंतरानं खुर्चीवरुन उठावं लागेल.
- साधारणतः एक तास बसून काम केल्यानंतर कमीत कमी 10 मिनिटांचा ब्रेक घ्या.
- तुम्ही डेस्कवर बसूनही काही फिजिकल अॅक्टिव्हिटी करु शकता.
- ऑफिसचं काम करताना मधे काही मिनिटांचा ब्रेक घ्या आणि जागेवरुन उठून फेरफटका मारा.
- शक्य असल्यास ऑफिसमध्ये स्टँडिंग डेस्कचा वापर करा.
- आपल्या लंच ब्रेकचा वापर वॉक करण्यासाठी करा.
- 15 ते 30 मिनिटं केलेला वॉकही धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
- कमी बसणं आणि शरीर अॅक्टिव्ह ठेवणं आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Egg for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रोज खा अंडी; पण कशी, उकडून की तळून?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )