(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Singer KK Death : हृदयविकाराचा झटका येण्याआधी केके यांना जाणवली होती 'ही' लक्षणं; या 7 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Singer KK Death : केके कोलकातामधील उल्ताडांगा येथील गुरुदास महाविद्यालयाच्या नझरूल स्टेजवर संगीत कार्यक्रम करत होते. या दरम्यान, त्यांच्या लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
Singer KK Death : 'तडप-तडप के इस दिल से', 'पल याद आयेंगे वो पल' आणि 'आँखों में तेरी' यांसारखी अनेक सुपरहिट रोमँटिक गाणी गाणारे बॉलिवूड गायक केके यांचे कोलकाता येथे लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कृष्णकुमार कुन्नाथ असे त्यांचे पूर्ण नाव असून ते अवघे 53 वर्षांचे होते.
असे सांगितले जात आहे की, केके कोलकातामधील उल्ताडांगा येथील गुरुदास महाविद्यालयाच्या नझरूल स्टेजवर संगीत कार्यक्रम करत होते. या दरम्यान, त्यांच्या लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता हा शो सुरू झाला. कार्यक्रमानंतर ते एस्प्लानेडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. जिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रात्री 10:30 च्या सुमारास त्यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नेण्यात आले. आणि तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
केके यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केके यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती आणि त्यांची दोन मुले असा परिवार आहे.
हृदयविकाराचा आजार नेमका आहे काय?
हृदयविकाराचा झटका ही एक मेडीकल इमर्जंन्सी आहे. याचा अर्थ या स्थितीत रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे, रक्त हृदयाकडे नीट वाहू शकत नाही किंवा ते थांबते. मेडीकल भाषेत याला मायोकार्डियल इन्फेक्शन (myocardial infarction) म्हणतात.
रक्त प्रवाह कमी किंवा थांबणे
रक्ताच्या नसा किंवा धमन्यांमधील रक्तप्रवाह मंदावणे, तसेच थांबणे. हे त्यांच्या शरीरामध्ये जमा झालेल्या कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थांमुळे होते. मंद रक्तप्रवाहामुळे गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे रक्त प्रवाह प्रतिबंधित होतो आणि त्यामुळे रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यापासून रोखते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
अस्वस्थता हृदयविकाराचे सामान्य लक्षण
असे सांगितले जात आहे की, गायक केके परफॉर्मन्स संपल्यानंतर हॉटेलच्या रूममध्ये पोहोचल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थता हे हृदयविकाराच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. तसेच या आजाराचे कारण समजून घेण्यासाठी तसेच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी उशीर करतात.
हृदयविकाराच्या झटक्याची इतर लक्षणे
हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, एखाद्या व्यक्तीला खांदे, हात, पाठ, मान, जबडा आणि दातांमध्ये अस्वस्थता किंवा वेदना जाणवते. कधीकधी ही वेदना पोटाच्या वरच्या भागात देखील दिसून येते. या लक्षणांव्यतिरिक्त, हृदयविकाराच्या झटक्याची इतर लक्षणे म्हणजे छातीत दुखणे जसे की छातीत घट्टपणा जाणवणे, थंड घाम येणे, थकवा, अपचन, चक्कर येणे, मळमळ आणि धाप लागणे.
हृदयविकाराचा झटका सामान्य होत आहे
अलीकडे, हृदयविकाराच्या वाढत्या प्रकरणांमध्ये जीवनशैलीचे अनेक घटक कारणीभूत आहेत. आजच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक आहे. उच्च रक्तदाब, अपुरी झोप, अवेळी जेवण, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- World No-Tobacco Day 2022 : धूम्रपान करणाऱ्यांनो वेळीच सावध व्हा! तुम्हालाही अंधत्व येऊ शकतं
- Home Remedies For Piles: मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..
- Health Tips : यकृतासाठी या 5 गोष्टी आहेत वरदान; रक्तही होईल स्वच्छ
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )