एक्स्प्लोर

National Cancer Awareness Day 2022 : आज आहे 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस'; जाणून घ्या यामागील लक्षण आणि उपचार

National Cancer Awareness Day 2022 : भारतात 7 नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन' साजरा केला जातो. या दिवशी कर्करोगासारख्या धोकादायक आजाराबद्दल जनजागृती केली जाते.

National Cancer Awareness Day 2022 : 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन' हा दिवस सर्वप्रथम 2014 मध्ये साजरा करण्यात येईल असे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जाहीर केले होते. त्यानुसार दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन (National Cancer Awareness Day)' देशभर साजरा करण्यात येतो. कर्करोग आणि त्याची लक्षणे तसेच त्याच्या उपचाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization - WHO) अभ्यासानुसार कर्करोग हे जगभरात होणाऱ्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. 

राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाचे महत्त्व (National Cancer Awareness Day Importance) :

2014 मध्ये, आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाचे मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या जीवघेण्या आजाराला वेळीच पकडण्याची गरज ओळखून त्यांनी या दिवसाची सुरुवात केली. या दिवशी सरकारी रुग्णालये आणि महापालिकेच्या दवाखान्यात लोकांना मोफत तपासणी केली जाते. हा दिवस नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. त्यांनी कर्करोगाशी लढण्यासाठी दिलेल्या महान योगदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिन पाळतात.

 कर्करोगावर काय उपचार केले जाऊ शकतात?

  • कर्करोगासाठी अनेक प्रकारचे उपचार आहेत. हे उपचार व्यक्तीच्या शरीरात कर्करोग किती पसरला आहे आणि तो कोणत्या टप्प्यात आहे यावर अवलंबून आहे.
  • कर्करोगाच्या उपचारात केमोथेरपी, हार्मोन थेरपी, इम्युनोथेरपी, रेडिएशन थेरपी इत्यादी उपचार पर्याय केले जातात.
  • कर्करोगाच्या उपचाराची पद्धत देखील रुग्णाच्या आरोग्यावर आणि त्याच्या कौटुंबिक इतिहासावर अवलंबून असते.
  • जर कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आला तर तो अगदी सहज बरा होऊ शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Cholesterol Level : कोलेस्ट्रॉल पातळीची उच्च सीमारेषा काय? निरोगी व्यक्तीमध्ये कोलेस्ट्रॉल किती असावे? जाणून घ्या सविस्तर

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget