Malaria Fever : मलेरियाची लागण झाल्यास 'हे' पदार्थ खाण्याची चूक करु नका, होईल नुकसान
Malaria Fever : मलेरिया अतिशय धोकादायक आजारांपैकी एक आहे. संक्रमित मच्छर चावल्याने हा रोग होतो. या आजारावर वेळीच योग्य उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याचाही धोका असतो.
Malaria Fever : सध्या व्हायरल फ्लू आणि मलेरिया यांसारख्या आजारांची साथ आहे. मलेरिया हा डासांमुळे पसरणारा रोग आहे. मलेरिया अतिशय धोकादायक आजारांपैकी एक आहे. संक्रमित मच्छर चावल्याने हा रोग होतो. हा डास चावल्याने तुमच्या शरीरात विषाणूाच शिरकाव होतो. हा विषाणू तुमच्या शरीरातील रक्ताच्या पेशींवर हल्ला करण्यास सुरुवात करतो. या आजारावर वेळीच योग्य उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याचाही धोका असतो. मलेरियाची लागण झालेल्या व्यक्तीला ताप, थकवा येतो आणि हुडहुडीही भरते.
मलेरियाची लक्षणे
मलेरिया आजाराची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : ताप, घाम येणे, अंगदुखी, उलट्या, डोकेदुखी, थकवा, ओटीपोटात दुखणे, अतिसार, अशक्तपणा, स्नायू दुखणे, विष्ठेमधून रक्त येणे यांचा समावेश होतो.
मलेरियाची लागण झाल्यास चुकूनही 'या' गोष्टींचं सेवन करू नका
मलेरियाची लागण झाल्यावर ताप येतो, त्यामुळे थंड पाणी अजिबात पिऊ नका किंवा थंड पाण्याने अंघोळ करू नका. रुग्णाने आंबा, डाळिंब, लिची, अननस, संत्री किंवा लिंबू ही फळे घेऊ नयेत. दही, गाजर, मुळा यांसारख्या थंड पदार्थांचे सेवन टाळा. तिखट-मसाले किंवा आम्ल युक्त पदार्थ खाणं टाळा. बाहेरचे तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणं टाळा.
मलेरियाची लागण झाल्यास काय सेवन करावे?
मलेरियाच्या रुग्णाने सफरचंद खावं. खिचडी, साबुदाणा हे पौष्टिक तसेच पचायला सोपे असलेले पदार्थ खावेत. याचं सेवन करणं फायदेशीर आहे. तापामुळे तोंडाची चव गेल्यासारखे वाटल्यास तुम्ही लिंबू कापून त्यावर काळी मिरी पावडर किंवा रॉक सॉल्ट टाकून ते चोखू शकता. मलेरियाच्या तापात पेरू खाल्ल्यास रुग्णाला फायदा होतो. पाण्यात तुळशीच्या पानांसह काळी मिरी टाकून हे पाणी उकळा. आता हे गाळून प्या. तुम्हाला याचा फायदा होईल.
मलेरियापासून वाचण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या
डासांची घरामध्ये किंवा बाहेर पैदास रोखा. यासाठी आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घ्या. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. त्यामुळे घराजवळील नाले साफ करा. पाणी साचणं टाळण्यासाठी आजूबाजूला असणारे खड्डे बुजवा. घराबाहेर रिकामे डबे किंवा पत्रे यामध्ये पाणी साचू देवू नका. घरामध्ये आणि घराबाहेर प्रत्येक कोपऱ्यात वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करा. पावसाळ्यात डासांपासून संरक्षण होण्यासाठी संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला. कुलर वापरत असल्यास त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आणि औषध फवारणी करा.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )