एक्स्प्लोर
Advertisement
कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे सुपरफुड्स करतील मदत
कोरोनाने सध्या थैमान घातलं आहे. अशातच वारंवार डॉक्टरांकडून शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सीचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यासाठीचं आपण आपल्या आहारात या सुपरफुड्स समावेश दररोज करावा.
मुंबई : जगभरात कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने हातपाय पसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती याबाबत सगळीकडे चर्चा होताना दिसत आहेत. याचं कारणही कोरोना व्हायरसच आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्ला वारंवार जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांच्या वतीने केला जात आहे. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी आहारातही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांसोबतच डॉक्टर्सही देत आहेत.
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर वारंवार 'व्हिटॅमिन सी' (Vitamin C) असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. आरोग्य मंत्रालयाअंतर्गत एफएसएसएएआयने व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या अशा सुपरफुड्सची यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे सुपरफुड्स दररोज खावीत.
डिप्रेशन जीवघेणं ठरु शकतं, याची लक्षणे कोणती?
आवळा आवळा पोषक द्रव्यांनी परिपूर्ण आहे. आवळा हा व्हिटॅमिन सी चा एक स्रोत असून शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करतो. नर्वस सिस्टम, इम्युन सिस्टम आणि त्वचेसाठी गुणकारी आहे. दररोज एक आवळा खालल्याने शरीरारसाठी आवश्यक असलेली 46 टक्के व्हिटॅमिन सी ची गरज पूर्ण करु शकतो. संत्र संत्रा एक असं फळ आहे की ज्यात विविध प्रकारच्या व्हिटॅमिन आणि पोषक घटकांचा समावेश आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. 100 ग्रॅम संत्रामध्ये 53.2 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. संत्र आपल्या रोगप्रतिकारक आरोग्यास चालना देण्यासाठी मदत करतं. यात ‘व्हिटॅमिन डी’चा देखील समावेश असतो. पपई एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये दररोज लागणाऱ्या व्हिटॅमिन सीच्या आवशक्यतेपेक्षा दुप्पट व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त, पपईमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेट असतं. हे सर्व त्वचा, रोग प्रतिकारशक्ती आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतं. शिमला मिर्ची / भोपळी मिर्ची तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शिमला मिर्चीमध्ये कोणत्याही आंबट फळांप्रमाणे व्हिटॅमिन सीचे प्रमाण असतं. यात व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन असते जे शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली वाढवू शकते. त्याचबरोबर त्वचा आणि डोळे निरोगी ठेवण्यातही फायदेशीर ठरते. पेरु पेरू हा व्हिटॅमिन सीचा आणखी एक समृद्ध स्रोत आहे. त्यात संत्रापेक्षा अधिक व्हिटॅमिन सी असते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह देखील भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढायला मदत होते. लिंबू लिंबू हे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंटचे सर्वात सामान्य स्त्रोत आहे, जे रोगांशी लढण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी प्रभावी असतं. (टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.) महत्त्वाच्या बातम्या :Coronavirus Lockdown | लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय
Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?लॉकडाऊनदरम्यान मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, तज्ज्ञांचं मार्गदर्शन
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
क्रीडा
भारत
Advertisement