एक्स्प्लोर
Advertisement
Makar Sankranti 2023 : मधुमेह असल्यामुळे मिठाईपासून दूर राहावं लागतंय? अशी बनवा शुगर फ्री तिळाची चिक्की
Makar Sankranti 2023 : यंदा मकर संक्रांतीला तुम्हाला मधुमेह रुग्णांसाठी स्पेशल शुगर फ्री तिळाची चिक्की बनवता येईल. ही बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...
Makar Sankranti 2023 : यंदा मकर संक्रात 15 जानेवारीला आहे. घरोघरी खमंग तिळाचे लाडू, चिक्की, तिळ पापडी असे तिळाचे गोड-गोड पदार्थ तयार केले जात आहेत. लहानथोर सगळे तिळगुळाचा आनंद घेत आहेत. पण अशामध्ये मधुमेह रुग्णांना गोड पदार्थांपासून दूर राहावं लागत आहे. तिळाच्या पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो, यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना हे पदार्थ खाता येत नाहीत. पण मधुमेह रुग्णांसाठी स्पेशल शुगर फ्री तिळाची चिक्की बनवता येईल. ही बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...
1. तिळाची चिक्की
साहित्य
एक कप तीळ, 250 ग्राम गूळ, एक टीस्पून वेलची पावडर
कृती
- सर्वात आधी एक पॅन गरम करा.
- यामध्ये तीळ भाजून घ्या, नंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्या.
- आता एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात गूळ घाला.
- त्याचा पाक तयार करा.
- आता गुळाच्या पाकामध्ये तीळ आणि वेलची पूड घाला.
- हे मिश्रण चांगले मिसळा.
- एक प्लेट घ्या, त्याला तूप लावा आणि त्या प्लेटमध्ये तिळाचे मिश्रण पसरवा.
- या चिक्की हव्या त्या आकारात कापून घ्या.
2. शेंगदाणे आणि तिळाची चिक्की
साहित्य
2 कप शेंगदाणे, 1/2 कप तीळ, 1/2 कप गूळ, 3 टीस्पून तूप, 1 टीस्पून वेलची पावडर, मनुका
कृती
- सर्व प्रथम कढईत शेंगदाणे भाजून घ्या.
- आता एका प्लेटमध्ये काढा, त्यानंतर तीळही भाजून घ्या.
- नंतर शेंगदाण्याचे बारीक वाटून घ्या.
- गुळाचा पाक तयार करा.
- त्यात वेलची पूड आणि तूप घाला.
- या मिश्रणात शेंगदाणे आणि तीळ मिसळा.
- हे मिश्रण प्लेटवर पसरवा, नंतर चाकूने हव्या त्या आकारात कापून घ्या.
3. बदाम चिक्की
साहित्य
1 कप बदाम, 1/2 कप गूळ, 1-2 टीस्पून वेलची पावडर
कृती
- सर्व प्रथम एका कढईत बदाम भाजून घ्या.
- हे बदाम एका प्लेटमध्ये काढा आणि त्याचे तुकडे करा.
- आता एका भांड्यात पाणी गरम करून त्यात गूळ घालून त्याचा पाक तयार करा.
- गुळाचा पाक जास्त घट्ट किंवा खूप पातळ होऊ देऊ नका.
- आता गुळाच्या पाकामध्ये बदाम मिसळा
- या मिश्रणात वेलची आणि मनुकाही टाका.
- एका प्लेटमध्ये तूप लावून हे मिश्रण त्यावर पसरवा.
- आता चाकूने हव्या त्या आकारात याचे काप करुन घ्या.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement