Makar Sankranti 2023 : संक्रांतीनिमित्त तुमच्या प्रियजनांना 'या' खास शुभेच्छा द्या; अन् सणाचा आनंद द्विगुणित करा
Makar Sankranti Wishes 2023 : सूर्य या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात.
Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. बाजारात विविध रंगांचे पतंग, सजावटीच्या वस्तू, हलव्याचे दागिने आणि तीळाचे लाडू पाहायला मिळतायत. सण म्हटला की नातेवाईक, मित्रमंडळींना शुभेच्छा देणंही आलं. आजकाल व्हॉट्सअपच्या माध्यमातून शुभेच्छा देणं फार सोपं झालं आहे. त्यामुळे शुभेच्छा संदेशांच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच तुमच्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देऊ शकता आणि सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.
1. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा
2. गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
3. गोड गुळात एकत्र होईल तीळ,
उडेल पतंग आणि खुलेल मन,
प्रत्येक दिन असेल सुखाचा आणि प्रत्येक क्षण शांतीचा.
तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
4. हृदयातील कटूता सगळी विसरुनी
तीळगुळाचा गोडवा यावा,
दुःखे हरावी सारी अन
आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
5. गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तीळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
6. सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा..
सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...
सूर्य या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीला महाराष्ट्रात संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती (उत्तरायण/ माघी/ संक्रांती), ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती असं म्हटलं जातं. यामध्ये 'संक्रांती' म्हणजे 'हस्तांतरण'. हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. त्यामुळे येणारी मकरसंक्रांत ही तुमच्या आयुष्यातील कटुता दूर करून प्रेमाचा गोडवा दरवळत राहावा या शुभेच्छा.
मकर संक्रांतीला अनेक सामाजिक उपक्रम तसेच सण अगदी आनंदात आणि उत्साहाने साजरे केले जातात. सामाजिक सण जसे की रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, बोनफायर आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते. अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात. दर बारा वर्षांनी, हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात. जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक, अंदाजे 60 ते 100 दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या कार्यक्रमात, ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा तसेच यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात.
महत्त्वाच्या बातम्या :
Makar Sankranti 2023 : नवीन वर्षातला पहिलाच सण म्हणजे 'मकरसंक्रांत'; वाचा या दिनाचं पारंपरिक महत्त्व