Health Tips : पावसाळ्यात लहान मुलांमध्ये वाढत्या आजाराचे कारण नेमके काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Viral Diseases In Childrens : पावसासोबतच शित लहरींमुळे सर्दी, खोकला, ताप या साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे लहान मुले यामुळे अधिक बाधित होत आहेत.
Viral Diseases In Childrens : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झालेले जाणवतायत. पावसासोबतच (Monsoon) शित लहरींमुळे सर्दी, खोकला, ताप या साथीच्या आजारांमध्ये (Viral Diseases) वाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे लहान मुले यामुळे अधिक बाधित होत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये हे प्रमाण जवळपास 50 ते 70 टक्के वाढलं आहे. त्यामुळे तुम्ही पावसाचा आनंद लुटण्यासाठी विकेंडला कुठे पर्यटन स्थळी जात असाल तर लहान मुलांना घेऊन जाणं टाळा. असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. दरम्यान मुलं आजारी पडण्यामागील नक्की कारण काय? अशा वातावरणात त्यांची काळजी कशी घ्यावी? याबाबत नाशिकचे बालरोगतज्ञ मिलिंद भराडीया (Milind Bharadia) यांनी काही महत्वाची माहिती दिली आहे.
पावसाळ्यात लहान मुलं आजारी पडण्यामागील कारणं :
- वातावरणात झालेल्या बदलांमुळे मुले आजारी पडतात.
- गेल्या दोन महिन्यांचा आणि आजचा विचार केला तर जवळपास हे प्रमाण 50 ते 70 टक्के वाढलं आहे.
- दूषित पाणी, दूषित हवा आणि दूषित परिसर ही यामागील मुख्य कारणं दिसून येत आहेत.
- दूषित पाण्यामुळे कावीळ, डायरिया, विषमज्वर होतो.
- दूषित हवेमुळे न्यूमोनिआ, बालदमा याचे प्रमाण पावसाळ्यात वाढते.
- दूषित परिसर असेल तर डास, माशांचे प्रमाण वाढते आणि यामुळे मलेरिया होतो.
- पर्यटन स्थळी गर्दीच्या ठिकाणी गेल्याने अपघातही होत आहेत.
- पाणी उकळून प्यावे, शक्यतो घरातीलच अन्नपदार्थ खा. बाहेरचे अन्न टाळा, उबदार कपडे घालावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
- कोरोनाचे प्रमाण वाढलेले दिसत नाही. लक्षण जरी दिसत असले तरी मात्र त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज पडत नाही, ते लवकर बरेही होतात.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : पावसाळ्यात सतत शिंका येणे ही सर्दी आहे की एलर्जी? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
- Monsoon Tips : पावसाळ्यात वारंवार सर्दी होतेय? 'हे' रामबाण उपाय वापरून पाहा
- Parenting Tips : पावसाळ्यात लहान मुलांना द्या फ्लूची लस, जाणून घ्या का गरजेची आहे लस?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )