(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : पावसाळ्यात सतत शिंका येणे ही सर्दी आहे की एलर्जी? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Health Tips : वारंवार शिंका येणे, अंगावर पुरळ येणे श्वास घेण्यास त्रास होणे ही एॅलर्जी असू शकते.
Monsoon Health Tips : जगभरात वेगवेगळ्या एलर्जी होण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढते आहे. जगातील लोकसंख्येपैकी 25% लोकांना वेगवेगळ्या एलर्जीचा त्रास भेडसावतो आहे. याचं कारण वाढती लोकसंख्या आणि बदलणारे हवामान आहे. या संदर्भात एम.डी. पॅथॉलॉजीच्या लॅब डायरेक्टर डॉ. रूची कपूर यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
एलर्जी म्हणजे काय?
एलर्जी हा रोगप्रतिकार प्रणाली प्रतिसादाचा एक भाग आहे. कोणत्याही प्रकारच्या एलर्जीमुळे आपल्या शरीरावर कोणतेही गंभीर परिणाम होत नाहीत. हे समजून घ्या. शरीराला आवश्यक असणाऱ्या तसेच सवय असलेल्या पदार्थांपेक्षा इतर बाहेरचे परदेशी पदार्थ खाल्ले तर यामुळेसुद्धा तुम्हाला एलर्जीचा त्रास होऊ शकतो.
एलर्जी होण्यामागे काही सामान्य कारणे :
1. प्राण्यांचे पदार्थ : काही प्राण्यांपासून तयार केलेले अन्न खाल्ल्यास, नाकात धूळ गेल्यास, क्रॉकरोट पासून.
2. ड्रग्स : पेनिसिलीन आणि सल्फा ड्रग्स
3. पदार्थ : गहू, शेंगदाणे, दूध आणि अंडी
4. किटक डंक : मधमाश्या आणि मच्छर.
5. वनस्पती : गवतापासून परागकण, तण
एलर्जीची काही सामन्य लक्षणे :
1. शिंका येणे आणि खाज सुटणे, नाक गळणे.
2. अस्वस्थ वाटणे. श्वास घेण्यास त्रास होणे. खोकला येणे.
3. अंगावर लाल पुरळ येणे
4. पोटात दुखणे, उलट्या येणे किंवा अतिसार
5. डोळ्यांतून वारंवार पाणी येणे
6. त्वचा कोरडी पडणे, लाल होणे.
एलर्जीपासून सुटका कशी मिळवाल?
एलर्जीपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्हाला आधी कोणत्या एलर्जीचा त्रास होतोय हे समजून घेणे गरजेचे आहे. काही सामान्य उपाय खालीलप्रमाणे आहेत.
1. तुमच्या ट्रिगर पॉईंट्सना टाळा : जरी तुमची एलर्जीवर ट्रिटमेंट सुरु असेल तरी तुम्ही तुमच्या ट्रिगल पॉईंटकडे दुर्लक्ष करू नका. उदा.. जर तुम्हाला परागकणांचा त्रास असेल तर खिडक्या दरवाजापासून दूर राहा. तसेच ज्यांना धुळीची एलर्जी असेल तर त्यांनी त्यापासून दूर राहावे.
2. खाण्यावर लक्ष ठेवा : ज्यांना एलर्जीचा त्रास असेल तर वेळोवेळी आपल्या आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. आपण काय खाल्ल्याने आपल्यावर काय परिणाम होतो याची काळजी आपणच घेतली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या :