एक्स्प्लोर

Health News : गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केव्हा करावी?

Health News : व्यायाम आणि औषधे यासारखे पर्याय वापरुन झालेल्या पण त्यांचा उपयोग न झालेल्या रुग्णांसाठी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय ठरतो. या लेखात गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक जाणून घेऊया.

Health News : सततच्या गुडघेदुखीचा (Knee Pain) कामावर, सोशलायझिंगवर, झोपेवर किंवा इतर दैनंदिन कामांवर परिणाम होत असेल तर गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Knee Replacement Surgery) करुन घेणे कदाचित गरजेचे आहे. व्यायाम आणि औषधे यासारखे पर्याय वापरुन झालेल्या पण त्यांचा उपयोग न झालेल्या रुग्णांसाठी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय ठरतो. या लेखात गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक जाणून घेऊया. तसंच गुडघे प्रत्यारोपणतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच ही शस्त्रक्रिया करुन घ्या.

गुडघेदुखीचा त्रास असलेल्या बहुतेकांची मनःशांती ढळते. गुडघेदुखी थांबवण्यासाठी गुडघा प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये गुडघ्याची खराब झालेली कूर्चा आणि हाड प्रत्यारोपणतज्ज्ञ काढून टाकतात आणि कृत्रिम भाग बसवतात. गुडघ्याची ऑर्थोप्लास्टी किंवा गुडघे प्रत्यारोपण केल्याने रुग्णाच्या दैनंदिन हालचाली सुलभ होतात, वेदना व अस्वस्थता कमी करण्यास मदत होते आणि त्याच्या/तिच्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो. पण तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता येत नाही. तुमची काही निकषांवर तपासणी केली जाते आणि मगच शस्त्रक्रिया करुन घेण्यास सांगितलं जाईल.

गुडघे प्रत्यारोपण करण्याची योग्य वेळ कोणती?

जर वेदना तीव्र असेल, सांध्यांमध्ये पुरेशी ताकद नसेल, गुडघेदुखीमध्ये अवघडत चालावे लागत असेल, स्नायू व अस्थिबंध कमकुवत झाले असतील, दैनंदिन कामे करण्यात अडचण येत असेल, नैराश्य आले असेल, हालचालींवरील बंधनांमुळे मानसिक ताण आला असेल तर तुम्हाला गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करुन घेण्याची गरज आहे, असे समजावे.

गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या आधी काय होते?

गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कशी असते याची माहिती तुम्हाला हाऊस ऑफ डॉक्टर्समधील गुडघे प्रत्यारोपणतज्ज्ञ देतात. गुडघे प्रत्यारोपणाबद्दल असलेल्या शंकांचे निरसन ते किंवा त्या करतात आणि गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तुम्ही तयार आहात का, हे पाहण्यासाठी तुमची सखोल तपासणी करण्यात येते. 

गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे फायदे पुढीलप्रमाणे 

गुडघेदुखीमुळे तुम्हाला थोडे अंतर चालणे, पायऱ्या चढणे, खाली बसणे, खुर्चीतून उठणे कठीण जाते. म्हणूनच गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किंवा संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे गुडघेदुखी व गुडघ्यातील ताठरपणा कमी होऊन तुम्हाला सर्व हालचाली सहजपणे करण्यास मदत होते. गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे ओपिऑइड वेदनाशामक आणि भविष्यात गुंतागुंत निर्माण करणाऱ्या स्टेरॉइड्सची गरज कमी होते. 

तात्पर्य 

कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी तज्ज्ञांकडून तुमची गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करुन घ्या. डॉक्टरांनी दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे हिताचे असते. गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारल्यावर गुडघ्यावर ताण येणाऱ्या हालचाली करु नका.

- राहुल मोदी, क्रीडा अस्थिविकार व खांदे शल्यचिकित्सक, हाऊस ऑफ डॉक्टर्स

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget