Lockdown Effect : चिंतेचा विषय; कायम टीव्ही आणि मोबाईल पाहणाऱ्या लहान मुलांचं वजन वाढलं
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि ऑनलाईन वर्ग भरवले जाऊ लागले. सर्व मुलं घरात बंद झाली. एवढे दिवस जे पालक मोबाईल आणि टीव्हीपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांच्यावर नाईलाजास्तव मुलांना अभ्यासासाठी मोबाईल आणि टीव्ही वापरण्याची मुभा देण्याची वेळ आली.
बीड : जीवघेण्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अशातच या कोरोनामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशातच कोरोनामुळे सर्वच लहान मुलं आपापल्या घरांमध्ये बंद असल्याचं पाहायला मिळालं. साधारणतः गेल्या वर्षभरापासून सर्वच मुलं घरातच बसून आहेत. कोरोनामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आणि ऑनलाईन लेक्चर्स सुरु झाले. घराबाहेर पडणं बंद झाल्यामुळे आपसूकच मैदानात जाऊन खेळणंही बंद झालं. त्यामुळे कोरोना संकटामुळे मागच्या एक वर्षापासून मुलं घरातच बसून आहेत. त्यामुळे मुलं घरात मोबाईल किवा टीव्हीचा मनोरंजनासाठी आणि अभ्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. या साधनांमुळे मात्र मुलांच्या शरीराची हालचाल बंद झाली आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊन अनेक मुलांच्या वजनात मोठी वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे.
आता मुलामधील वाढलेल्या वजनाचे गंभीर परिणाम समोर येऊ लागले आहेत. काही मुलांचं पाच किलो वजन वाढलंय, तर काहींचं दहा ते बारा किलोंनी वजन वाढलंय. कोरोना संकटामुळे अनेक मुलांना खेळण्या बागडण्याची इच्छा असली तरी खेळण्यासाठी घराबाहेर पडता येत नाही. अशातच कोरोना संकट आणि मुलांच्या आरोग्याबाबत पालकवर्गात मात्र चिंतेत आहे. बीड शहरात राहणारी अवघ्या 9 वर्षांची तन्वी गव्हाणे. लॉकडाऊनच्या एका वर्षात तन्वीच तब्बल 12 किलो वजन वाढलं. एक वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे शाळेतले खेळ बंद झाले. कोरोनामुळे मित्रमैत्रिणींसोबत खेळणही बंद करवं लागलं. तसेच इतके दिवस जो टिव्ही आणि मोबाईल मुलांपासून दूर ठेवण्यासाठी आटापीटा करत होते, तोच टिव्ही आणि मोबाईल ऑनलाईन लेक्चर्स आणि शैक्षणिक कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांनाच नाईलाजानं मुलांच्या हातात सोपवणं भाग पडलं.
चिमुरड्यांचं वजन वाढण्यासाठी लॉकडाऊनमुळे बदललेली त्यांची जीवनशैलीही तेवढीच कारणीभूत ठरत आहे. अनेक मुलाचे मैदानी खेळ बंद झाले. जिम बंद झाल्यानं मुलांनी व्यायामाकडे दुर्लक्ष केलं. सायकलिंग पोहाण्यासारख्या शारीरिक क्रिया बंद झाल्या. त्यामुळे शरीर अधिक सुस्त बनत चाललं आहे. घरातच असल्यामुळे मुलांना फास्ट फूड आणि शीतपेयाची सवय लागली आणि मुलांची दिनचर्याच बदलून गेली. आता वाढलेल हे वजन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं मत बालरोग तज्ञांनी व्यक्त केलं आहे. लहान मुलांच्या वजनामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मुलाचं वजन वाढलं असं म्हणून आपल्या मुलांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं देखील डॉक्टरांचं मत आहे.
दरम्यान, वाढणारं वजन ही अगदी प्रौढांपासून लहानग्यांपर्यंत भेडसावणारी समस्या आहे. मर्यादेपेक्षा अधिक वजन वाढल्यानं शरीराच्या इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बाहेर कोरोना आहे, घरातच बसा, असा उपदेश वारंवार मुलांना दिला जातो. मग घरात बसलेल्या या चिमुकल्यांना एकतर टीव्ही पाहिजे, नाहीतर मोबाईल खेळण्यासाठी हातात पाहिजे. पण काळाची गरज असणारी हीच सवय आता लहान मुलांच्या तब्येतीसाठी अपायकारक ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Tips: जाणून घ्या Oximeter वापरण्याची योग्य पद्धत
- Covid-19 : लहान मुलांचं कोरोनापासून संरक्षण कसं कराल? अशी घ्या काळजी
- Covid-19 : कोरोनामुक्त झाल्यानंतर उद्भवतो 'या' गंभीर समस्यांचा धोका, ऑक्सफर्डच्या रिसर्चमधून खुलासा
- Covid-19 : कोरोनापासून बचाव अन् रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयनं सांगितले उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )