Katrina Kaif Fitness : योगा, जॉगिंग अन् बरचं काही; कतरिना कैफचा फिटनेस फंडा
Katrina Kaif Fitness Mantra : बॉलिवूडची चिकनी चमेली आपल्या अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते. ती तिच्या फिटनेसबाबत कधीच हयगय करत नाही.
Katrina Kaif Fitness Mantra : बॅालिवूडची 'चिकनी चमेली' कतरिना कैफ तिच्या सौंदर्याबरोबरच फिटनेससाठीसुध्दा खूप चर्चेत असते. बॉलिवूडच्या टॅाप अभिनेत्रींमध्ये कतरिनाचे नाव आघआडीवर आहे. याचं कारण कतरिना कितीही व्यस्त असली तरी वर्कआऊट मात्र कधीच चुकवत नाही. ती तिच्या फिटनेसबाबत कधीच हयगय करत नाही. आपल्या फिटनेससाठी ती नियमित वर्कआउट आणि डाएट फॅालो करते.
View this post on Instagram
कतरिनाचे अॅब्स पाहून तर कोणीही तिच्या फिटनेसच्या प्रेमात पडेल. वर्कआउट करतानाचे बरेच व्हिडिओ देखील ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करत असते. पण तुम्हाला माहित आहे का? वर्कआउटबरोबरच स्वयंपाक घरातील काही गोष्टींचा आधार घेत ती फिट राहण्याचा प्रयत्न करते. तुम्ही देखील डाएटमध्ये योग्य तो बदल करून अॅब्स तयार करू शकता. जाणून घेऊया कतरिनाचं फिटनेस रुटिन...
कतरिनाचं वर्कआउट ( Katrina Kaif Workout)
कतरिना कैफ तिच्या नेहमीच्या फिटनेस रुटीनमध्ये पिलेट्स (व्यायामाचा प्रकार), योगाभ्यास, वेट ट्रेनिंग ,जॉगिंग आणि सायकल चालवणं यांचा समावेश करते. या व्यतिरिक्त ती तिच्या परफेक्ट फिगरसाठी जीममध्ये कार्डिओ, केटलबेल्स, पॉवरप्लेट यासोबतच बरेच व्यायामप्रकार देखील करते. कतरिना दर दिवशी दिवसातून किमान 45 मिनिटं व्यायाम करते.
कतरिनाचं डाएट (Katrina Kaif Diet)
कतरिना फिगरला मेंटेन ठेवण्यासाठी नियमित व्यायामासोबत निरोगी आहाराचंही सेवन करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती सकाळी उठताच एक ग्लास पाणी पिते. त्याव्यतिरिक्त कतरिना नाश्त्यात मॅक्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करते. ज्यामध्ये की उकडलेल्या भाज्या, फळांचा समावेश करते. याव्यतिरिक्त नाश्त्यामध्ये ओट्स, अंड्याचा पांढरा भाग, डाळिंबाचा रस घेते. दुपारच्या जेवणात कतरिना वरण-भात घेते. तसेच सलाडचाही समावेश आवर्जुन करते. रात्रीच्या जेवणात ती सूप, उकडलेल्या भाज्या आणि सलाडचा समावेश करते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )