#CoronaTestCenter तुमच्या जवळील कोरोना चाचणी केंद्र Google वर कसं शोधाल?
गुगलने देशभरातील 300हून अधिक शहरांमधील 700पेक्षा जास्त कोरोना चाचणी केंद्रांची माहिती गुगल सर्च, असिस्टंट आणि मॅप्सवर जोडली आहे. या माहितीची यादी मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि गुजराती भाषांमध्ये उपलब्ध आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात येणाऱ्या कोरोना टेस्ट सेंटर्सची माहिती शोधण्यासाठी गुगलने एक नवी घोषणा केली आहे. कोरोनाच्या अधिकृत वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांविषयी माहिती देण्यासाठी गुगल इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि माय-गव्हर्नमेंटसोबत गुगल कार्यरत आहे. ही नवीन सुविधा इंग्रजी व भारतातील इतर आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे, मराठी, हिंदी, बंगाली, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि गुजराती.
आता Google search आणि Assistant वर, वापरकर्त्यांना कोरोनो व्हायरसशी संबंधित काहीही शोधण्यासाठी एक 'चाचणी' टॅब दिसेल. कोरोनाशी संबंधित अनेक प्रकारची माहिती या ऑप्शनवर क्लिक केल्यावर युजर्सना वाचता येणार आहे. तसेच कोरोना चाचणी केंद्राची यादी देखील तुम्ही या ऑप्शनवर क्लिक केल्यावर मिळवू शकता.
गुगलवर चाचणी केंद्र शोधण्यासाठी काय कराल?
गुगल अॅप, गुगल मॅप्स किंवा गुगल असिस्टंटवर सर्च बॉक्यमध्ये Corona Test किंवा Covid-19 Test सर्च करा
सर्च केल्याबरोबर तुम्हाला कोविड 19 अलर्ट दिसून येतील, या शेजारीच तुम्हाला मॅप्सवर काही ठिकाणी लाल निशाण दिसेल
ज्या ठिकाणी कोरोना टेस्ट लॅब्स आहेत ती ही ठिकाणं आहेत
तुम्हाला लक्षणं आढळल्यास किंवा कोरोना झाल्याची शक्यता वाटल्यास Learn More या ऑप्शनवर क्लिक करा
कोरोना चाचणीसाठी लॅबमध्ये जाण्यापूर्वी चाचणी पात्रता निश्चित करण्यास हा ऑप्शन तुम्हाला मदत करतो.
700 पेक्षा जास्त कोरोना चाचणी केंद्रांची यादी
जेव्हा युजर्स गुगल मॅप्सवर 'Corona Test' किंवा 'Covid -19 Test' सारखे शब्द शोधतात, तेव्हा आपल्या जवळच्या कोरोना टेस्ट लॅबची यादी त्यांना दिसेल. सध्या 300 शहरांमध्ये पसरलेल्या 700 हून अधिक चाचणी लॅब 'Google Search, Assistant आणि Google Mapsवर शोधल्यास तुम्हाला मिळणार आहेत.
Google देशभरातील नवीन चाचणी लॅब्सची माहिती रजिस्टर करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांसोबत कार्यरत आहे. तसेच, Google वर सुचवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याबद्दलची माहितीदेखील दिली गेली आहे.
ही मार्गदर्शक तत्वे कोरोना चाचणीसाठी लॅबमध्ये जाण्यापूर्वी चाचणी पात्रता निश्चित करण्यात मदत करतात. अधिक माहितीसाठी, वापरकर्ते 'अधिक जाणून घ्या' Learn More यावर क्लिक करू शकतात, जिथे त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू), भारत सरकारकडून अधिकृत माहिती मिळेल.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )