Diet For Glowing Skin : चिरतरुण दिसायचंय, मग 'या' फळांचा डाएटमध्ये समावेश करा, फक्त आठवडाभरातच फरक दिसेल!
Diet For Glowing Skin : आजकाल, त्वचा चमकदार करण्यासाठी, लोक सर्वात महाग उत्पादनं विकत घेतात आणि महागडे त्वचेचे उपचार करून घेतात, परंतु त्यांना हे माहित नाही की, याहीपेक्षा शरीराला योग्य पोषण देणं यापेक्षा महत्त्वाचं आहे.
How To Keep Skin Young: ग्लोईंग (Glowing Skin), हायड्रेटेड (Hydrated Skin) आणि यंग (Young Skin) स्किनसाठी आपल्यापैकी अनेकजण सर्वोतोपरी प्रयत्न करतात. बाजारात मिळणारी अनेक औषधं, उत्पादनांचा वापर केला जातो. तसेच, अनेक पार्लर ट्रिटमेंट्सचाही वापर केला जातो. पण स्किन ग्लो (Glowing Skin) हवा असेल किंवा त्वेचचं आरोग्य जपायचं असेल, तर आहारही तितकाच महत्त्वाचा ठरतो.
आजकाल, त्वचा चमकदार करण्यासाठी, लोक सर्वात महाग उत्पादनं विकत घेतात आणि महागडे त्वचेचे उपचार करून घेतात, परंतु त्यांना हे माहित नाही की, याहीपेक्षा शरीराला योग्य पोषण देणं यापेक्षा महत्त्वाचं आहे. खरं तर, जर तुम्ही सकस आहार केला तर तुम्ही कोणत्याही क्रीम किंवा केमिकलच्या मदतीशिवाय तुमची त्वचा चमकदार करू शकता.
निरोगी आहार ही निरोगी त्वचेची गुरुकिल्ली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फळं तुम्हाला तुमचं शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करू शकतात. फळांमध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं असतं, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच, ती निरोगी आणि तरुण राहते. म्हणूनच, आम्ही तुम्हाला तुमच्या आहारात काही फळांचा समावेश करून निरोगी आणि सुंदर त्वचा कशी मिळवू शकता ते सांगणार आहोत. फळे जीवनसत्त्वे, मिनिरल्स आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक तत्वांनी भरलेली असतात, जी तुमच्या त्वचेला पोषण देतात आणि तरुण बनवतात.
संत्री (Orange Benifits)
संत्री म्हणजे, व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं जीवनसत्व आहे. कोलेजन सिंथेसिससाठी व्हिटॅमिन सी देखील आवश्यक आहे, जे स्किन टाईट ठेवतं आणि चेहऱ्यावर सुरकुत्या रोखतं. यामुळे त्वचेचं तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय व्हिटॅमिन सी त्वचेला दुरुस्त करण्याचं काम करतं. संत्र्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, जे त्वचेची जळजळ, त्वचेवरील लालसरपण कमी करण्यास मदत करतात.
सफरचंद (Benifits Of Apple)
'An Apple A Day Keep Doctors Away' हे तत्व आपल्या सर्वांना माहीत आहेच. सफरचंद हा पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यात फायबर, व्हिटॅमिन ए, बी यासह अनेक पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात. शरीरातील वृद्धत्व वाढवण्यासाठी फ्री रॅडिकल्स जबाबदार असतात. पेशींना हानी पोहोचवण्याबरोबरच, यामुळे आपल्या त्वचेवरही वाढत्या वयाच्या खुणा दिसतात. अशा परिस्थितीत सफरचंदात असलेले पोषक तत्व या फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि आपल्या त्वचेचं संरक्षण करतात.
बेरीज (Benifits of Berry For Health)
स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी यांसारख्या बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स असतात. जी शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करतात. याशिवाय, ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात आणि त्वचेची छिद्र उघडतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. त्यात असं एन्झाइम आढळतात, जे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात आणि चेहऱ्यावर चमक वाढवतात. तसेच यामुळे नव्या पेशी वाढवून त्वचेचा पोत सुधारतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )