Summer and Health : उन्हामुळे होऊ शकतं 'सन पॉयजनिंग'; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Summer and Sun Poisoning : उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाला असून आरोग्य सांभाळण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. उन्हाळ्यात सन पॉयजनिंगचा त्रास अधिक होतो. जाणून घ्या सन पॉयजनिंग म्हणजे काय, त्याची लक्षणं आणि उपाय...
Summer and Sun Poisoning : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून ऋतुमानात बदल झाल्यामुळे किरकोळ आजार होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात सनबर्न आणि टॅनिंगचा त्रास सामान्य समजला जातो. मात्र, तुम्ही कधी सन पॉयजनिंग बद्दल ऐकले आहे का? सन पॉयजनिंगबद्दल अनेकजण संभ्रमात असतात. सनबर्नच्या तुलनेत सन पॉयजनिंग अधिक धोकादायक असतो.
> सन पॉयजनिंग म्हणजे काय?
सन पॉयजनिंग हे सनबर्नचे घातक रुप आहे. तुम्ही अधिक वेळ सूर्याच्या अतिनील किरणाच्या संपर्कात राहिल्याने होतो. सन पॉयजनिंगचा त्रास उद्भवल्यास वैद्यकीय उपचाराने समस्येवर मात करता येते.
> सन पॉयजनिंगचे लक्षण
- गंभीर स्वरूपात रॅशेस् येणे
- त्वचेवर फोड येणं
- डिहायड्रेशन
- चक्कर येणे
- श्वास घेण्यास त्रास होणे
- बेशुद्ध होणे
> सन पॉयजनिंगमुळे आजारी पडण्याचा धोका?
सन पॉयजनिंगचा परिणाम त्वचेवर होतो. तुम्ही अधिक वेळ उन्हात राहता, त्यावेळेस अल्ट्राव्हायलेट किरणे तुमच्या त्वचेचं नुकसान करतात. त्यामुळे तुम्हाला वेदना होतात. याच्या परिणामी अशक्तपणा, बेशुद्ध होणे, थकवा जाणवणे आदी लक्षणं जाणवतात. जर, तुम्हाला अशी लक्षणे दिसत असल्यास तुम्ही अधिक प्रमाणात पाणी, फळांचा रस आदी द्रव पदार्थांचे सेवन करावे. त्याशिवाय सन पॉयजनिंग झालेल्या ठिकाणी स्पर्श करणे टाळावे.
> सन पॉयजनिंगपासून कसा बचाव करावा?
- सनस्क्रीनचा वापर करावा. एसपीएफ 30 पेक्षा अधिक असलेल्या सनस्क्रीन लोशनचा वापर करावा. उन्हात जाण्याआधी कमीत कमी 15 ते 30 मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे. दर दोन तासांनी सनस्क्रीन लावावी.
- उन्हात जाण्याआधी त्वचा पूर्ण झाकली जाईल असे पूर्ण कपडे घाला. त्याशिवाय, सनग्लासेसचा वापर करावा. उन्हात जाताना टाइट कपड्यांऐवजी ढीले कपडे घालावे.
- उन्हाळ्यात सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान घरातून बाहेर न पडण्याचा प्रयत्न करावा.
- नवजात बालकं, लहान मुलांना उन्हात नेणं टाळावे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )