Kidney Disease : किडनी फेल न होण्यासाठी एका दिवसात किती पाणी प्यायला हवं? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Water Proportion To Avoid Kidney Failure : पाण्यामुळे किडनीचे कार्य सुधारते आणि शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर काढली जातात. जाणून घ्या किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावे.
![Kidney Disease : किडनी फेल न होण्यासाठी एका दिवसात किती पाणी प्यायला हवं? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात How much water should be drunk in day to avoid kidney failure what the experts say health body Anatomy Tips To Healthy Kidneys marathi news Kidney Disease : किडनी फेल न होण्यासाठी एका दिवसात किती पाणी प्यायला हवं? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/10/ba615e5d9ed8fe9593315a0028881e92172329028165793_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्याच्या मदतीने किडनीचे कार्य सुधारते आणि शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर काढली जातात. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक अवयवाचे कार्य योग्य प्रकारे होणे अत्यंत आवश्यक आहे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज किमान किती पाणी प्यायचे याबद्दल माहिती घेऊयात.
आपल्या अवयवांचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी अन्न आणि पाणीदेखील आवश्यक आहे. विशेषतः मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. मूत्रपिंडाच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी देखील महत्त्वाचे आहे कारण ते किडनीचे डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरणापासून संरक्षण करू शकते आणि मूत्रपिंडाच्या अनेक आजारांचा धोका कमी करू शकते. त्यामुळे दिवसभरात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
पाणी कमी प्यायल्याने मूत्रपिंडाचा त्रास
किडनी व्यवस्थित काम करण्यासाठी पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास, डिहायड्रेशन झाल्यास सर्वात आधी किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरात खराब कचरा साचू लागतो ज्यामुळे किडनीला हानी पोहोचते. पाणी कमी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो. याशिवाय युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) आणि किडनी निकामी होऊ शकते.
Water Proportion To Avoid Kidney Failure : निरोगी व्यक्तीने 3-4 लिटर पाणी प्यावे?
किडनी निरोगी ठेवण्यासाठी किती पाणी प्यावे? आरोग्य संशोधनानुसार, निरोगी व्यक्तीने दिवसातून 3-4 लिटर पाणी प्यावे. तथापि हा नियम तुमचे वय, कामाचं स्वरूप, ऋतू आणि शरीर यावर देखील अवलंबून आहे. मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी एखाद्याने दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे.
किडनीचे आजार असलेल्यांनी काय करावं?
किडनीचा आजार ज्यांना ज्यांना आहे त्यांनी कमी पाणी प्यावे. जर एखाद्याला मूत्रपिंड संबंधित समस्या असल्यास त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पाण्याचं प्रमाण ठरवावं. मूत्रपिंड निकामी झालेल्या किंवा ज्यांना किडनी डायलिसिसची गरज आहे त्यांनी कमी पाणी प्यावे. जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर दबाव पडतो.
ही बातमी वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)