Maida Making Process: गव्हापासून मैदा बनतो तरी कसा? ...म्हणून मैदा जास्त खाणं चांगलं नसतं...
Maida Making Process: मैदा बारीक आणि पांढरा शुभ्र असतो. मात्र हा मैदा नेमका बनतो तरी कसा हा प्रश्न उपस्थित होतो. मैदा हा हानिकारक का मानला जातो. हा मैदा नेमका कसा बनतो...
Maida Making Process: मैदा जरी आरोग्यासाठी हानिकारक मानला गेला असला तरी सामान्यतः प्रत्येक घरात त्याचा वापर केला जातोच. सणांमध्ये किंवा आपल्या घरात शंकरपाळ्या, करंज्या करतानाही मैदा वापरतात, पिझ्झा बनवायचा असेल तर त्यातही मैद्यापासून तयार होतो. मोगलाई पराठा देखील मैद्यापासून बनवला जातो. मैदा घातल्यानं पदार्थांना चव येते मात्र हे जास्त खाणं शरीराला चांगलं नाही.
मैदा बारीक आणि पांढरा शुभ्र असतो. मात्र हा मैदा नेमका बनतो तरी कसा हा प्रश्न उपस्थित होतो. आपण ज्या गव्हापासून चपाती किंवा पोळ्या बनवतो त्याच गव्हापासून मैदाही बनतो. मग मैदा हा हानिकारक का मानला जातो. हा मैदा नेमका कसा बनतो.
मैद्याचं पीठ फक्त गव्हापासून बनते, परंतु गव्हाचा फक्त एंडोस्पर्म नावाचा पांढरा भाग यासाठी वापरला जातो. प्रत्यक्षात त्यावर प्रक्रिया केली जाते. ब्लीच केलेले गव्हाचे पीठ ज्यावर इतकी प्रक्रिया केली जाते की गव्हातील आवश्यक फायबर त्यातून निघून जातो.
मैदा कसा बनतो स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ...
पहिली स्टेप : गहू स्वच्छ केला जातो. मैदा हा अतिशय बारीक पदार्थ आहे, त्यामुळे गव्हाची साफसफाई देखील योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. अनेक फिल्टर्स लावले जातात आणि सर्व घाण, धूळ, दगड, भुसे काढून टाकले जातात, या प्रक्रियेला खूप वेळ लागतो.
दुसरी स्टेप : आता एकदा गहू साफ केल्यावर त्यातील भुसा पूर्णपणे काढून टाकला जातो, या प्रक्रियेत फक्त गव्हाचे दाणे वापरले जातात.
तिसरी स्टेप : आता गहू बारीक करून तो एकदा नाही तर दोनदा हाय प्रेशर रोलरने बारीक केला जातो, अशा प्रकारे खूप बारीक पावडर बाहेर येते, त्यानंतर रिफायनिंग होते.
चौथी स्टेप : दळल्यानंतर तयार झालेल्या पांढर्या पिठावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. यामुळेच ते गव्हाच्या पीठापेक्षा वेगळे दिसते.
पाचवी स्टेप : आता पीठ पॅकेजिंगसाठी वेगवेगळ्या फिल्टर प्रक्रियेतून जाते. या प्रक्रियेत सर्व कण काढून टाकले जातात. पॅकिंग केल्यानंतर मैदा विक्रीसाठी पाठविला जातो.
मैदा आरोग्यासाठी फायदेशीर का नाही?
मैदा हा अतिशय आरोग्यदायी आणि नैसर्गिक घटकांपासून बनवला जातो, परंतु तो बनवताना त्यातील सर्व गुणधर्म काढले जातात.
मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण नगण्य असते, त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात.
यात गव्हाचे गुणधर्म अजिबात नसतात आणि ते स्टार्चसारखेच असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने समस्या निर्माण होतात.
मैदा खाल्ल्यास लठ्ठपणाची समस्या वाढते. आतड्याच्या समस्याही उद्भवतात.
ही बातमी देखील वाचा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )