एक्स्प्लोर

Tips For Healthy Heart : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार? रोजच्या आहारात काय बदल करावेत?

Healthy Heart Tips : गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आहाराच्या चुकीच्या सवयी हृदयाच्या आरोग्यास घातक ठरत असून आपल्या रोजच्या आहारात काय बदल करावेत हे जाणून घेऊया.

Tips For Healthy Heart : गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या (Heart Disease) घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबच आहाराच्या सवयी देखील बदलल्या आहेत. आहाराच्या चुकीच्या सवयी हृदयाच्या (Heart) आरोग्यास घातक ठरत असून आपल्या रोजच्या आहारात काय बदल करावेत हे या लेखाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.

1) आहारातील मीठाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा

उच्च सोडियमयुक्त आहारामुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो. हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांनी सोडियमचे प्रमाण कमी असलेल्या आहार घ्यावा. हृदयविकार असलेल्या लोकांसाठी सोडियमचे सेवन हे दररोज 2,000 मिलीग्रामपेक्षा कमी असावे.
 
Healthy Heart Tips : आहारातील सोडियमचा वापर मर्यादित करण्यासाठी खास टिप्स:

  • हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की फ्रोजन फूड, मीट, हवाबंद डब्यातील सूप, रेडी टु कुक पास्ता, सॅलड ड्रेसिंग इतर मसाल्यांचे सेवन मर्यादित करा.
  • प्री-पॅकेज केलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खरेदी करताना, पोषण लेबले वाचण्याची खात्री करा. शक्य असल्यास लो सोडियमयुक्त खाद्यपदार्थांची निवड करा.
  • स्वयंपाक करताना मिठाच्या प्रमाणावर मर्यादा आणा. चवीसाठी लिंबूचा रस, मसाले, औषधी वनस्पती आणि इतर सोडियमचे प्रमाण कमी असलेल्या घटकांचा वापर करा. 

2) जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा  

यामध्ये शरीराला आवश्यक असलेले फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि इतर आवश्यक पोषकतत्वांनी समृद्ध असलेले आहाराचे समावेश असणे आवश्यक आहे. जास्त कॅलरीज आणि पोषणमूल्य कमी असलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित करणे योग्य राहिल.

Healthy Heart Tips : अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) च्या शिफारशींनुसार पोषक आहारात समावेश असलेले पदार्थ
 
बीन्स आणि इतर शेंगा

फळे आणि भाज्या

तृणधान्य

सुकामेवा आणि तेलबिया
 
मांसाहरी व्यक्तींकरीता 

चिकन (विदाऊट स्कीन)

सीफूड

लो फॅट्स असलेले दुग्धजन्य पदार्थ
 
मटण, मिठाई आणि ट्रान्स-फॅट, सॅच्युरेटेड फॅट, सोडियम, कोलेस्टेरॉल किंवा रिफाईंड शुगरचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा वापर करणे टाळा
 
मर्यादेपेक्षा जास्त द्रव पदार्थांचे सेवन टाळा. हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांमध्ये, जास्त प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन हे रक्तदाब वाढीचे कारण ठरु शकते आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. दररोज किती पाणी प्यावे याचा सल्ला डॉक्टरांकडून घ्यावा. लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ किंवा औषधं जी शरीराला अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करतात त्यांचा वापर हृदयरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा.

4) मद्यपानाचे व्यसन टाळा

मद्यपानाचे व्यसन टाळल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यास मदत होईल. अति मद्यपानाने स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका तसेच इतर आजारांचा धोका वाढू शकतो.

5) कॅलरीजचे प्रमाण कमी करा, पोषकतत्वांनी युक्त अन्नाचे सेवन करा

तुमच्या हृदयावरील ताण कमी करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला वजन कमी करण्याचा सल्ला देतात. वजन कमी करण्यासाठी आहारात नेहमीपेक्षा कमी कॅलरीजच् सेवन आवश्यक आहे. त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी करा आणि पोषकतत्वांनी युक्त अन्नाचे सेवन करा आणि आहारतज्ञांचा सल्ला घ्या.
 
हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांसाठी पोषक तत्वांनी युक्त आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. हृदयविकाराच्या उपचारासाठी पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. हार्ट फेल्युअरच्या निदानानंतर डॉक्टर मीठ, प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील पदार्थ, अल्कोहोल, फास्ट फूड आणि जंक फूड वापर न करण्याचा सल्ला देतात.आहारात अचूक बदल करण्यासाठी आहारतज्ञांची मदत घ्या.

- डॉ ब्रजेश कुमार कुंवर, वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ, कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
Ankita Prabhu Walawalkar Wedding Photos: वालावलकरांचो थोरलो जावई... नवऱ्यासाठी खास पोस्ट करत 'कोकण हार्टेड गर्ल'नं शेअर केले लग्नाचे PHOTO
वालावलकरांचो थोरलो जावई... नवऱ्यासाठी खास पोस्ट करत 'कोकण हार्टेड गर्ल'नं शेअर केले लग्नाचे PHOTO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra NewsPrayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
Ankita Prabhu Walawalkar Wedding Photos: वालावलकरांचो थोरलो जावई... नवऱ्यासाठी खास पोस्ट करत 'कोकण हार्टेड गर्ल'नं शेअर केले लग्नाचे PHOTO
वालावलकरांचो थोरलो जावई... नवऱ्यासाठी खास पोस्ट करत 'कोकण हार्टेड गर्ल'नं शेअर केले लग्नाचे PHOTO
new india cooperative bank: मॅनेजरवर दबाव टाकून भाजपवाल्यांना कर्जे द्यायला लावली, स्वत:ची जागा भाड्याने देऊन लाखो कमावले? 'त्या' आरोपांवर राम कदमांचं स्पष्टीकरण
मॅनेजरवर दबाव टाकून भाजपवाल्यांना कर्जे द्यायला लावली, स्वत:ची जागा भाड्याने देऊन लाखो कमावले? 'त्या' आरोपांवर राम कदमांचं स्पष्टीकरण
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.