एक्स्प्लोर

Health Tips: 'हे' आहेत डाळिंब खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; अनेक आजाराच्या समस्या होतील दूर

Pomegranate Benefits: फळांमध्ये डाळिंब हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी डाळिंबाचे दाणे खाण्याचा किंवा त्याचा रस पिण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.

Pomegranate Health Benefits: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी फळं खाणं अत्यंत गरजेचं आहे. फळांमध्ये डाळिंबाचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही तुमच्या आहारात डाळिंबाचा समावेश केला तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. डाळिंबामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आहेत, जे शरीरासाठी फायदेशीर आहे. लाल दाण्यांसोबत डाळिंबाचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. रोज एक डाळिंब खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार दूर राहतात.

डाळिंबामुळे अनेक घातक आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. तुम्ही डाळिंबाचे दाणे किंवा त्याचा रस करुन देखील पिऊ शकता. दोन्ही प्रकारे त्याचा आरोग्याला फायदा होतो. डाळिंबांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह असतात. डाळिंबाची साल, पानं आणि बियांचा देखील औषधांसाठी वापर केला जातो, त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. 

तब्येतीमध्ये लवकर सुधारणा होण्यासाठी नियमित एक डाळिंब खाणे आवश्यक आहे. डाळिंबात इतर फळांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराला अनेक धोकादायक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. इतकेच नाही तर याशिवाय डाळिंबात व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डाळिंबाचा रस पिऊ शकता.

डाळिंबामुळे शरीरातील रक्त तर वाढतेच, पण स्मरणशक्ती देखील तीक्ष्ण होते. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर दररोज एक डाळिंब नक्की खा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डाळिंबाचा रस पिऊ शकता, ज्यामुळे तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहू शकता. डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.

आजकाल अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते, अशा परिस्थितीत डाळिंबाचे सेवन त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. डाळिंबामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याशिवाय, डायबिटीस असलेले रुग्ण देखील आरामात डाळिंबाचे सेवन करू शकतात, या समस्येवर डाळिंब खूप उपयुक्त ठरू शकते

जर तुम्हाला अपचन, गॅस, शौचास साफ न होणे अशा समस्या असतील तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये डाळिंबाचा समावेश करणे गरजेचे आहे. डाळिंबात फायबर आणि अनेक पोषक घटक आढळतात, जे पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात. बद्धकोष्ठता किंवा जळजळ होण्याची समस्या असेल तर डाळिंब खाणे खूप फायदेशीर आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 

हेही वाचा:

Health Care: ही आहेत जगातील सर्वात आरोग्यदायी 8 फळं, यादी बघितल्यावर तुम्हाला वाटेल हे आपणही खाऊ शकतो

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्तTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
Embed widget