मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन देशातील लॉकडाऊन तीन मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात घोषणा केली. त्यामुळे आता देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाला असून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घरातच बसावं लागणार आहे. तसेच आणखी काही दिवस लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.


दरम्यान, अनेक दिवसांपासून घरातच असल्यामुळे कंटाळा येणं स्वाभाविक आहे. तसेच आळसही वाढला आहे. यादरम्यान, अशी काही लोक जी योगा क्लास आणि जिममध्ये जात होते. लॉकडाऊनमुळे तेही बंद करण्यात आलं आहे.


आपल्या सर्वांना व्यायामाचं महत्त्व माहित आहेच. व्यायामाच्या प्रकारांमध्ये योगाभ्यासाचं फार महत्त्व आहे. योगाभ्यासातील विविध आसनांद्वारे आपल्या श्वासांवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं.


वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे


लॉकडाऊनमुळे तुम्हाला बाहेर जाणं शक्य नाही. तर अशावेळी तुम्ही घरीच वेगवेगळी योगासनं करू शकता. ज्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होईल.


भुजंगासन


हे आसन शरीर लवचिक करण्यासोबतच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत करतं. या आसनात शरीराचा आकार सापा सारखा बनतो, अर्थात भुजंगासारखा म्हणूनच या आसनाला भुजंगासन असे म्हटले जाते. हे आसन करण्यासाठी आधी पोटावर झोपावे. दोन्ही पायांना जोडावे. हनुवटी फरशीवर ठेवावी. कोपरे कमरेला टेकलेले असावेत. आता हळूहळू दोन्ही हातांच्या आधारे कमरेपासून वरचा भाग जितका शक्य असेल तितका वरती उचलावा. वर आकाशाकडे पाहावे. आता त्याच सावकाश गतीने पुन्हा जमिनीच्या दिशेने यावे. हे आसन करण्याचा कालावधी तुम्ही आपल्या शारीरिक क्षमतेनुसार कमी अधिक ठरवू शकता.


सुखासन


सुखासन म्हणजे मांडी घालून बसण्याची परंपरा भारतामध्ये प्राचीन काळापासून सुरू आहे. परंतु सध्याच्या जीवनशैलीतील बदलांमुळे लोक मांडी घालून बसलेलेल दिसतच नाहीत. सुखासन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. सुखासन करण्यासाठी मांडी घालून बसा आणि पाठीचा कणा एकदम सरळ ठेवा. लक्षात ठेवा हे आसन करताना हातांच्या मुद्रेची विशेष काळजी घ्या. काही काळ या आसनात बसल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. तर सुखासन केल्यामुळे शरीरातील रक्त-प्रवाह समांतर स्वरुपात चालू राहतो. ज्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात उर्जा निर्माण होते. तसेच सुखासन केल्यामुळे लठ्ठपणा, पित्त, पोटांचे विकार यांपासून बचाव होतो.


ताडासन


ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाचे ताडासन असे नाव आहे. ताडासन हे सरळ उभे राहून केले जाते. पायाची बोटे व पंजे समांतर ठेवून हात सरळ कमरेला लावून उभे राहावे. त्यानंतर हळू हळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्या वर नेताना केवळ तळ पायांवर उभे राहावे. मग हाताच्या पंज्यांना विरुद्ध दिशेने नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा होते त्या दिशेत उभे राहावे. ताडासन नियमित केल्याने पायांचे स्नायू व पंजे मजबूत होत असून आळस निघून जातो आणि ताजेतवाने वाटते. तर शरीराची तोलक्षमता वाढते. मानसिक संतुलन वाढण्यासही मदत होते.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?


Health Tips : व्हायरल फिवरची प्रमुख लक्षणं, औषधांऐवजी 'हे' घरगुती उपायही ठरतात फायदेशीर


Corona virus | कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावा


Health Tips : ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यासाठी 'हे' उपाय करतील मदत

डायबिटीजचे रूग्णही खाऊ शकतात गोड पदार्थ?; जाणून घ्या काय म्हणतो रिसर्च