मुंबई : अनेकदा आपण डायबिटीजबाबत अनेक सल्ले ऐकत असतो. हे खाऊ नका... ते खा... असं करू नका... ते केलं तर डायबिटीज नियंत्रणात राहतं अन् बरचं काही. ज्यांनान डायबिटीज असतं त्यांना सतावणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, डायबिटीज असणाऱ्या व्यक्ती गोड पदार्थ खाऊ शकतात की नाही? या प्रश्नाबाबत अनेक डॉक्टर्स आणि रिसर्च वेगवेगळे मुद्दे मांडताना दिसत आहेत. अशातच डायबिटीजने पीडित व्यक्तींच्या मनात संभ्रम निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी गोड पदार्थ खावे की नाही, त्याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने सांगितलं की, डायबिटीजने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी एखाद्या खास परिस्थितीत गोड पदार्थ खाल्ले तर त्यांच्या शरिरीवर त्याचा फार गंभीर परिणाम होत नाही. कधीतरी डायबिटीजने ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती गोड पदार्थ खाऊ शकतात. कारण जर डायबिटीज आहे म्हणून गोड पदार्थ खाणं टाळलं तर शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे कधीतरी आणि मर्यादेत गोड पदार्थ खाणं आरोग्यासाठी गरजेचं असतं. त्यामुळे अनेकदा डॉक्टर्सही सर्व गोड पदार्थ खाणं सक्तीने टाळण्याचा सल्ला न देता. गोड पदार्थांचं सेवन कमी करण्याचा सल्ला देतात. टाईप 2 डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी खासकरून गोड पदार्थ खाणं टाळण्याचा सल्ला देण्यात येतो.
डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी असा करावा आहार
जर गोड पदार्थ खायचे असतील तर फळांचे ज्यूस किंवा इतर पदार्थांऐवजी फळं खाणं फायदेशी ठरतं. कारण फळांमध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण अधिक असतं. यामुळे शरीराला नुकसानही होत नाही.
शुगर फ्रीचं सेवनही करू शकता
शुगर फ्रीमार्फत थोडे गोड पदार्थ खाऊ शकता. तसेच शुगर फ्रीपासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचं सेवनही करू शकता. दरम्यान, शुगर फ्रीचं जास्त सेवन करणं टाळावं. कारण याचं जास्त सेवन करणं हानिकारक ठरू शकतं.
टिप : सदर गोष्टी संशोधनांमधून सिद्ध झाल्या आहेत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या :