मुंबई : आज जागतिक आरोग्य दिवस आहे. दरवर्षी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन सात एप्रिल रोजी हा दिवस साजरा करतं. जगभरातील लोकांना आरोग्याप्रति जागरूक करण्यासाठी आणि आरोग्यच सर्व काही आहे, हे समजावण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


काय आहे इतिहास?


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली. 1950 रोजी पहिला जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. 1947मध्ये सात एप्रिल रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनची स्थापना झाली. ज्यावेळी या संघटनेची पहिली सभा घेण्यात आली. त्यावेळी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.


कशी घ्याल आपल्या आरोग्याची काळजी?


उपचार करण्यापेक्षा उत्तम आहे, आरोग्याची आधीपासूनच काळजी घेणं उत्तम असतं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने कोरोना व्हायरसचा जागतिक महामारी म्हणून घोषित केलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतचं औषध वा लस उपलब्ध नाही. या व्हायरसने जगभरात शेकडो लोकांचा बळी घेतला आहे. पण या घातक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काही उपाय आपण नक्कीच करू शकतो. थोडासं मनावर नियंत्रण ठेवलं आणि प्रशासनाचने सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन केलं तर आपण नक्कीच कोरोनाला नक्कीच हरवू शकतो. एवढचं नाहीतर काही गोष्टिंचं पालन करून आपण इतरही आजारांपासून दूर राहून आपलं आरोग्य जपू शकतो.


जाणून घेऊयात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय :


1. स्वच्छतेची काळजी घ्या.
2. स्वच्छ पाण्याचा वापर करा.
3.भरपूर पाणी प्या.
4. उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचं सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की, जास्त मीठ असणारे आणि जास्त गोड पदार्थ कमी प्रमाणात खा. गरजेपेक्षा जास्त खाणं टाळा. तसेच जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
5. निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करा.
6. शांत झोप घ्या.


आरोग्यासाठी हेल्थ इन्श्योरन्स आवश्यक


सध्याच्या धकाधकीच्या जीवनात घर, ऑफिस आणि कामाचा ताण, यामुळे अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्षं होतं. अशातच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आधीपासूनच तयार राहा. एखादा आजार किंवा दुर्घटनेपासून बचाव करण्यासाठी हेल्थ इन्श्योरन्स नक्की काढा.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?


Health Tips : व्हायरल फिवरची प्रमुख लक्षणं, औषधांऐवजी 'हे' घरगुती उपायही ठरतात फायदेशीर


Health Tips : ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यासाठी 'हे' उपाय करतील मदत


वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे