मुंबई : हाय ब्लड प्रेशरची समस्येकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. या आजाराला सायलेंट किलर असंही म्हणतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. तसेच याव्यतिरिक्त काही घरगुती उपायही ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया काही घरगुती उपाय...


हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शनच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी सर्वात आधी तुमची जीवनशैली बदलावी लागेल. जर वेळीच या समस्येकडे लक्ष दिलं नाही तर ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. सुरुवातीलाच ब्लड प्रेशरची समस्या जाणवत असेल तर काही घरगुती उपाय करू शकता पण जर त्रास जास्त होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.


ब्लड प्रेशर वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, टेन्शन किंवा तणाव. त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्वात आधी आहारातील मिठाचं प्रमाण कमी करा. जास्त मिठाचं सेवन केल्याने ब्लड प्रेशरची समस्या वाढते. त्यामुळे याकडे लक्ष द्या. तसेच तेलकट पदार्थ खाणंही टाळा.


लसणाचा करा आहारात समावेश


लसूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. याचं सेवन केल्याने हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासोबतच इतर आजारांपासूनही बचाव होतो. लसूण ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे. लसूण शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवतं. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही मदत करतो. तुम्ही लसूण पाण्यासोबतही खाऊ शकता. जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुमच्या डाएटमध्ये लसणाचं प्रमाण वाढवा.


काळी मिरीही ठरते फायदेशीर


काळी मिरीही ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी गुणकारी ठरते. जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर अर्धा ग्लास पाण्यात काळ्या मिरीची पावडर एकत्र करा आणि त्याचं सेवन करा. तसेच आहारातही याचा समावेश करा. काळी मिरी पचनक्रिया सुरळीत होण्यासाठीही मदत करते. तसेच दात आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे काळ्या मिरीचं नियमित सेवन सुरू करा. याव्यतिरिक्त आवळ्याची पावडर आणि कांद्याचं सेवनही ब्लड प्रेशरवर फायदेशीर ठरतं.


टिप : वरील सर्व उपाय घरगुती असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते.


संबंधित बातम्या :


Health Tips : हिवाळ्यात आइस्क्रिम खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

डायबिटीजचे रूग्णही खाऊ शकतात गोड पदार्थ?; जाणून घ्या काय म्हणतो रिसर्च

'ही' लक्षणं दिसत असतील तर लगेच डोळे तपासून घ्या

'ही' लक्षणं दिसली तर वेळीच सावध व्हा; लिव्हर खराब होण्याचे असू शकतात संकेत

डाळिंबाचे आरोग्यदायी फायदे; 'हे' आजारही पळतील दूर