मुंबई : आवळा आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आयुर्वेदातही आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. आवळा आपल्या आंबट आणि तुरट चवीसाठी ओळखला जातो. त्यामुळे अनेकजण आवळा पाहिला की नाकतोंड मुरडतात. पण आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे आवळा खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीएजिंग गुणधर्म असतात. तसेच आवळ्याचा ज्यूज प्याल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते.
अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. आवळा केस, त्वचा आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. जाणून घेऊया आवळ्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...
वजन कमी करण्याव्यतिरिक्त आवळा पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सिडंटने परिपूर्ण असतो, त्यामुळे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. आवळा ताप, घशातील खवखव किंवा समस्या, ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी, फुफ्फुसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतो, तसेच वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठीही आवळा मदत करतो. त्वचेसाठीही आवळा गुणकारी ठरतो. आवळा एक नैसर्गिक हेअर कंडिशनरच्या रूपातही काम करतो. आवळा फॅटी लिव्हर आणि कोलेस्ट्रॉलशी लढून शरीराचं वजन कमी करण्यासाठी लाभदायक असतो.
जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर आवळ्याचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. आवळा हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतो. आवळा शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करून चांगलं कोलेस्ट्रॉल तयार करण्याचं काम करतो. जर पोटात होणाऱ्या समस्या जसं, जळजळ, गॅस यांसारख्या समस्याही दूर करतो. त्यामुळे दिवसातून दोन वेळा आवळ्याचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. आवळा डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही मदत करतो.
टिप : सदर गोष्टी संशोधनांमधून सिद्ध झाल्या आहेत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या :
डाळिंबाचे आरोग्यदायी फायदे; 'हे' आजारही पळतील दूर
हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी दररोज ब्रश करणं ठरतं फायदेशीर; संशोधनातून खुलासा
'ही' लक्षणं दिसली तर वेळीच सावध व्हा; लिव्हर खराब होण्याचे असू शकतात संकेत
वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jan 2020 09:22 AM (IST)
आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे आवळा खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीएजिंग गुणधर्म असतात. तसेच आवळ्याचा ज्यूज प्याल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -