नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. जगभरातील आकड्यांबाबत बोलायचे झाले तर, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या साडे सात लाखांच्या पार पोहोचली आहे. तर आतापर्यंत 34 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 1347 वर पोहोचली आहे. तर यापैकी 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 138 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.


कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. तर इटलीनंतर सर्वाधिक मृत्यू हे स्पेनमध्ये आहेत. सध्या सर्वांना हैराण करणारी गोष्ट म्हणजे, अनेक कोरोनाग्रस्त रूग्णांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तपासणीचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे.


काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आतापर्यंत कनिका कपूरची चार वेळा तपासणी करण्यात आली असून चारही वेळा याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सर्वांसमोर प्रश्नचिन्ह उभं आहे की, एकदा कोरोनाची लागण झालेल्या लोकांना पुन्हा या व्हायरसची लागण होऊ शकते का?


पाहा व्हिडीओ : कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत एक ते दोन लाख मृत्यू होण्याचा अंदाज 



जर आपण चीन आणि जपानमधील आकडे पाहिलं तर उत्तर हो आहे. एकदा कोरोनाची लागण झालेल्या लोकांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते. आतापर्यंत समोर आलेल्या काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, हा व्हायरस तुमच्या शरिरात पुन्हा शिरकाव करू शकतो. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संशोधक अजुन या व्हायरसवर रिसर्च करत आहेत. तसेच या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी उपचाराचा शोध घेत आहेत.


अशी घ्या आपली काळजी


असं सांगण्यात येत आहे की, जेव्हा आपल्या शरीराला एखाद्या व्हायरसचा संसर्ग होतो, त्यावेळी उपचारादरम्यान त्या व्हायरसशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते. त्यानंतर दुसऱ्यांदा त्या व्यक्तीच्या शरीराला त्या व्हायरसचा संसर्ग होत नाही. जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे. त्यासाटी आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. तसेच सोशल डिस्टेंसिंगचं पालन करा. जर तुम्ही आधीपासूनचं एखाद्या आजाराने त्रासलेले आहात, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती खबरदारी घ्या. तसेच या आजाराची कोणतीही लक्षणं दिसून आली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.


संबंधित बातम्या :


Coronavirus | मुकेश अंबानी यांचं पीएम केअर्स फंडमध्ये 500 कोटींचं योगदान!


लढा कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर


coronavirus | कोरोनाविरोधातील लढाईसाठी बीसीसीआयकडून 51 कोटींची मदत