एक्स्प्लोर

Health News : कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे काय? हृदय विकार टाळण्यासाठी काय कराल? 

Health News : कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज हा हृदयाशी संबंधित विकार असून यामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग तसेच ऑर्गन डॅमेज होण्याचा धोका असतो.

Health News : कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज (Cardiovascular Disease) हा हृदयाशी संबंधित विकार असून यामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग (Disease of the Heart or Blood Vessels) तसेच ऑर्गन डॅमेज (अवयवांचे नुकसान) होण्याचा धोका असतो. हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या तीन मुख्य रक्तवाहिन्यांपैकी कोणत्याही एका रक्तवाहिनीमध्ये काही अडथळा निर्माण होऊन रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा त्या स्थितीला आपण हृदयविकाराचा झटका (Heart Attack) असे म्हणतो.

हृदयविकार हा सर्वात धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे. धूम्रपान, बैठे काम, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉलची पातळी, मधुमेह, स्थूलता, तणाव आणि वाढते वय यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बदलत्या जीवनशैलीनुसार वाढता ताण-तणाव, नैराश्य, व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप या साऱ्याच गोष्टींचा थेट परिणाम हृदयावर होत असतो. आपल्या हृदय आणि फुफ्फुसाचं आरोग्य चांगले राहण्याकरता खालील गोष्टींचा अवलंब करा. 

हृदय विकार टाळण्यासाठी काय कराल? 

हृदयविकाराच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. जसे काही अंतर चालल्यानंतरही दम लागणे आणि छाती जडपणा वाटणे, घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मधुमेह तसेच उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी अधिक सावध असणे गरजेचे आहे. सक्रिय जीवनशैली अंगाकारणे फायदेशीर ठरेल. 

आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. कोंड्याचा समावेश असलेले गव्हाच्या पीठाचा आहारात समावेश करा तसेच ज्वारी, नाचणी, मका यासारख्या धान्यांचाही रोजच्या आहारात समावेश करायला विसरु नका. यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते आणि ते कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते तसेच चांगले कोलेस्टेरॉल वाढवते.

वारंवार एकाच तेलात तळलेले पदार्थ खाणे टाळा. त्याच्याऐवजी ओमेगा 3 फॅटी ॲसिड किंवा सॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. जवस, तेल बिया, वनस्पती तेल, करडईचं तेल किंवा ॲालिव्ह ॲाईलचा आहारात समावेश करा. आहारात सुकामेवा, भाजलेले शेंगदाणे, बदाम, जवस या गोष्टीचाही समावेश करा.

तुमच्या आहारात ताजी फळे फळ आणि भाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. कारण त्यामध्ये जीवनसत्व, खनिज आणि फायबर यांचा समावेश असतो जे  हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. आहारात प्रथिनांचा पुरेसा समावेश असणे गरजेचे आहे. रोजच्या जेवणात मीठाचा वापर मर्यादित करा. डब्लूएचओच्या सल्ल्यानुसार एखाद्या व्यक्तीने दिवसभरात केवळ 5 ग्रॅम इतक्याच मिठाचे सेवन करणे आवश्यक आहे.

व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्तदाबासारख्या कोमॉर्बिडीटीज असलेल्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारचे व्यायाम टाळावे हे याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाते. एखाद्या व्यक्तीला रक्तदाब असल्यास, डॉक्टर त्या व्यक्तीला मागे झुकलेल्या स्थितीत (डिक्लाईन्ड पोझिशन) (पाय वर आणि डोके खाली) असा व्यायाम न करण्याचा सल्ला देऊ शकतात. तसेच कार्डिओ किंवा वेट लिफ्टिंगसारखा कोणताही व्यायाम सुरु करताना अचानक वेग वाढविणे किंवा तीव्रता वाढवणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरते. कोणताही व्यायाम हा वॉर्मअपने सुरु करावा. त्यानंतर मध्यम तीव्रतेचा व्यायाम आणि शेवटी त्याची तीव्रता कमी (कुलिंग डाऊन) करणे योग्य राहिल. हे सगळं करत असताना आपण पुरेसे पाणी पित आहात का याकडे लक्ष द्या.


- डॉ. प्रशांत पवार, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, वोक्हार्ट हॅास्पिटल्स, नाशिक

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget