Health Tips :हिवाळ्यात डोळे सतत लाल होत असतील तर जाणून घ्या तज्ज्ञांकडून उपाय; लगेच आराम मिळेल
Health Tips : हिवाळ्यात आपले डोळे अनेकदा लाल आणि सुजलेले दिसतात. जाणून घेऊया यामागील कारणे आणि तज्ज्ञांच्या मते त्यावर उपाय काय आहेत?
Health Tips : हिवाळ्यात (Winter Season) आपले डोळे अनेकदा लाल होतात. हिवाळ्यातील थंड वारे त्वचा (Skin Care Tips) आणि डोळ्यांतील ओलावा फार लवकर शोषून घेतात, त्यामुळे डोळे कोरडे आणि लाल होतात. याशिवाय धूळ, प्रदूषण, थंडीमुळे होणारे संसर्ग यामुळेही डोळे लाल होतात. कधीकधी ब्लेफेरायटिससारखे गंभीर आजार देखील कारण असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, डोळे लाल होऊ नयेत यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत ते जाणून घेऊयात.
डोळ्यांचा लालसरपणा तमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स
डोळ्यांची उघड झाप करा
हिवाळ्यात बाहेर जाताना डोळ्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. यासाठी डोळे झाकून ठेवा. थंड वारा आणि कडक सूर्यप्रकाश डोळ्यांतील ओलावा फार लवकर शोषून घेतात त्यामुळे डोळे कोरडे आणि लाल होतात. डोळ्यांना थंडी आणि प्रदूषणापासून वाचवता यावे म्हणून बाहेर जाताना चांगल्या दर्जाचे सनग्लासेस घालण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच, विनाकारण सूर्याच्या किरणांकडे बघत राहू नका. यामुळे डोळ्यांवर ताण येतो.
पुरेशी झोप घ्या
तज्ञांच्या मते, डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं देखील खूप गरजेचं आहे. दिवसातून किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून डोळ्यांना विश्रांती मिळेल आणि ऊतकांना दुरुस्त करण्याची संधी मिळेल.
हायड्रेट राहा
हिवाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं फार महत्वाचे आहे. यामुळे डोळ्यांसह संपूर्ण शरीराची आर्द्रता कायम राहते. हिवाळ्यातील थंड वारे आपल्या शरीरातील आर्द्रता शोषून घेतात. विशेषत: डोळ्यांवर सहज परिणाम होतो. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. हे शरीर आणि विशेषतः डोळे हायड्रेटेड ठेवण्यास तुम्हाला मदत करू शकेल.
हिवाळ्यात जर तुम्हाला तुमचे डोळ कोरडे होऊ नये. तसेच, कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी वेळीच डोळ्यांची काळजी घ्या. डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी पुरेशी झोप मिळणं फार गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )