(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : सारखं गरम पाणी पिताय? वेळीच सावध व्हा; होऊ शकतात गंभीर परिणाम
Health Tips : जास्त गरम पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Health Tips : आपल्या आहारातला महत्वाचा घटक म्हणजे पाणी. हा आहारातला घटकच नाही तर हे एक तत्व आहे. निरोगी शरीरासाठी वेळोवेळी पाणी प्यावे असे डॉक्टरांकून नेहमी सांगण्यात येते. मात्र, पाणी पिण्याबद्दल आणि पाणी पिण्याच्या अनेक परंपरागत चालत आलेल्या समजुती आणि गैरसमजुती आहेत. सध्याचं जीवनमान पाहता बहुतेक मंडळी प्रकर्षाने गरम पाणी पितात. पण हेच गरम पाणी तुम्ही जर जास्त प्रमाणात पित असाल तर तुमच्या आरोग्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
खोकला झाला किंवा सर्दी झाली तर काही लोक गरम पाणी पितात इथपर्यंत ठीक आहे. पण जास्त गरम पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
1. किडनीवर होणारा परिणाम : एका रिसर्चनुसार जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या नॉर्मल फंक्शनवर परिणाम होतो.
2. रक्ताच्या प्रमाणावर परिणाम : खूप गरम पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि इतर अनेक कार्डिओ समस्या जाणवू शकतात.
3. नसांना सूज येऊ शकते : सतत गरम पाणी प्यायल्याने नसांना सूज येऊ शकते. तसेच डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला जाणवू शकते.
'हे' पदार्थ तुमची हाडं कमकुवत करतात
हाडे हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. संपूर्ण शरीर हाडांवर अवलंबून असते, म्हणून हाडे मजबूत असणे महत्वाचे आहे. पण आपल्या आहारात असे काही घटक आहेत जी आपली हाडं कमकुवत करण्यास कारणीभूत आहेत
1. सोडा : जर तुम्ही खूप जास्त सोडा पित असाल तर ते तुमच्या हाडांसाठी हानिकारक ठरू शकते.
2. बीन्स (बीया) : बीन्स शरीराला कॅल्शियम शोषण्यापासून रोखू शकतात.
3. जास्त गोड पदार्थ : जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करणे केवळ हाडांसाठीच नाही तर सर्वच अवयवांसाठीही घातक आहे.
4. अधिक सोडियमवाले पदार्थ : तुम्ही जितके जास्त मीठ खाल तितके जास्त कॅल्शियम कमी होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )