Health Tips: 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो निद्रानाश
Health Tips of vitamins : व्हिटॅमिन शरीरात जर खूप मोठ्या प्रमाणावर कमतरता असेल तर संपूर्ण बाॅडी सिस्टीम बिघडू शकते. याचा थेट परिणाम हा मेंदूवर होतो. परिणामी तुम्हाला निद्रानाश होऊ शकतो.
Health Tips : संपूर्ण दिवस काम केल्यानंतर रात्रीची झोप खूप जास्त गरजेचे असते. मात्र बेडवर पडल्या पडल्या अनेक जणांना लगेच झोप येत नाही. झोप पूर्ण होत नसल्या कारणाने शरीरात बऱ्याच समस्या निर्माण होतात. ज्यामध्ये डोळ्यांखाली काळे वर्तुळ येणे, कायम अशक्तपणा जाणवणे, जेवण न जाणे, सारखी झोप येणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या झोप न येण्याच्या आजाराला निद्रानाश असे म्हणले जाते. शरीरात कमी असणाऱ्या व्हिटॅमिन्समुळे निद्रानाश होऊ शकतो.
Health Tips of vitamins : 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येत नाही झोप
शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे निद्रानाश होतो. ज्यामुळे तुमच्या झोपेचे संपूर्ण वेळापत्रक बिघडून जाते. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसले तर व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला मिळू शकते. त्याचबरोबर मासे, अंड्यातील पिवळा भाग, मशरूम , गायीचे दूध , सोया मिल्क, संत्र्याचा रस आणि ओटमील याचा समावेश रोजच्या आहारात केला तरीही व्हिटॅमिन डी मिळू शकते. तसेच यामुळे निद्रानाशचा त्रास कमी होऊ शकतो.
Health Tips in Marathi : व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेमुळे ही होऊ शकतो निद्रानाश
मेंदूमध्ये मेलाटोनिन आणि सेरोटोनिन याची पातळी योग्य असेल तर झोपेच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेमुळे निद्रानाश होतो. चिकन, सोयाबीन, ओट्स आणि भुईमूग याचा वापर रोजच्या जेवणात नियमित करावा.
Deficiency of Vitamins Symptoms: झोप न येण्याची लक्षणे
• दिवसा झोप येणे
• राग
• थकवा
• लक्ष केंद्रित करण्यात अडचण
Deficiency of Vitamins Symptoms: निद्रानाशाचे प्रकार
निद्रानाशाचे दोन प्रकार आहेत. प्राथमिक निद्रानाश , दुय्यम निद्रानाश. प्राथमिक निद्रानाशात, निद्रानाशाची समस्या कोणत्याही शारिरीक आजाराशी संबंधित नसते. परंतु दुय्यम निद्रानाशात, निद्रानाशाचे कारण आरोग्याशी संबंधित असू शकते, जसे की दमा, कर्करोग, नैराश्य आणि संधिवात असणे.
Deficiency of Vitamins Symptoms: प्राथमिक निद्रानाशाची कारणे
• नोकरी सोडणे, एखाद्या खास व्यक्तीचा मृत्यू होणे किंवा घटस्फोटाचा ताण घेणे.
• आजूबाजूचा आवाज, तापमान आणि प्रकाश हे देखील कारण असू शकतात.
• दिनचर्येतील बदल झोपेत अडथळा आणू शकतात.
• एका संशोधनात, निद्रानाश एक अनुवांशिक समस्या असू शकते असे सांगितले आहे.
Deficiency of Vitamins Symptoms: दुय्यम निद्रानाशाची कारणे
• नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्य समस्या
• रात्री वेदना आणि अस्वस्थता
• ऍलर्जी, नैराश्य, सर्दी, उच्च रक्तदाब, दमा यांवर औषधोपचार करणे
• गर्भधारणा
• गुटखा, अल्कोहोल, कॅफिनचा अतिवापर
Deficiency of Vitamins Symptoms: निद्रानाश कसा बरा करावा?
दिवसभर काम केल्यानंतर आळस किंवा थकवा जाणवत असेल तर डॉक्टर काही दिवस झोपेच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देऊ शकतात. पण निद्रानाश टाळण्यासाठी झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक करू नका, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आणि ही समस्या दूर होण्याऐवजी गडबडही होऊ शकते. परंतु तीव्र निद्रानाशात तुमची समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला उपचारांची गरज आहे. डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ले देऊन झोप न येण्याची समस्या सोडवू शकतात.
महत्वाच्या इतर बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )